'तो' जगात सर्वांत श्रीमंत आहे...तरीही रांगेत उभा राहतोय..!

वृत्तसंस्था
शनिवार, 19 जानेवारी 2019

वॉशिंग्टन: जगातील श्रीमंत व्यक्तींपैकी एक असलेले आणि मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स यांचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होतो आहे. बिल गेट्स चक्क एका बर्गरसाठी सर्वसामान्यांप्रमाणेच रांगेत उभे असलेला हा फोटो आता व्हायरल झाला आहे. गेट्स हे साध्या राहणीमानासाठी ओळखले जातात. शिवाय सामाजिक कार्यासाठी ते कायमच कोट्यवधी डॉलर देत असतात. 

मायक्रोसॉफ्ट कंपनीत काम करणाऱ्या एका माजी कर्मचाऱ्यानेच बिल गेट्स यांना बर्गर चेन स्टॉल बाहेर बर्गर खरेदी करताना पहिले आणि त्याने तो फोटो काढून सोशल मीडियावर शेअर केला त्यानंतर हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. बिल गेट्स यांना ‘डिक्’चा बर्गर विशेष आवडतो.  सर्वसामान्य ग्राहकांप्रमाणे रागेंत उभे राहून त्यांनी तो करंदी केला. 

गेल्यावेळी देखील जगातील निम्म्याहुन अधिक संपत्ती असलेले फेसबुकचे संस्थापक मार्क झुकेरबर्ग, अलीबाबा या ई-कॉमर्स कंपनीचे मालक जॅक मा आणि मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स यांच्या साध्या राहणीमानाबाबत सर्वत्र चर्चा सुरु होती. 

मायक्रोसॉफ्ट ही कंपनी पॉल आणि बिल गेट्स या दोघांनी मिळून स्थापन केली.काही वर्षातच ही जगातील सर्वात मोठ्या PC(व्यक्तिगत संगणक) सॉफ्टवेअर कंपनी बनली. मायक्रोसॉफ्टमधे असताना ते सॉफ्टवेअर बांधणी विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम पाहत होते. तसेच, गेट्स यांच्याकडे कंपनीचे सर्वाधिक वैयक्तिक शेअर्स (8 टक्के) आहेत. त्यांनी अनेक पुस्तकेही प्रकाशित केलेली आहेत. सन 1987पासून, बिल गेट्स यांचा  'फोर्ब्स' जाहीर करत असलेल्या जगातील श्रीमंत लोकांच्या यादीत समावेश होत आला आहे. वर्ष 2009 पर्यंत जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून त्यांची ख्याती होती. वर्ष 2011 मध्ये बिल गेट्स यांचे जगातील श्रीमंत लोकांच्या यादीत दुसरे स्थान व अमेरिकेच्या श्रीमंत लोकांच्या यादीत पहिले स्थान होते.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Billionaires they're just like us Bill Gates, 63, is spotted waiting in line to grab a burger