देना, विजया आणि बँक ऑफ बडोदाच्या विलीनीकरणाला केंद्राची मंजुरी

वृत्तसंस्था
बुधवार, 2 जानेवारी 2019

नवी दिल्ली: केंद्रीय मंत्रिमंडळाने विजया बँक, देना बँक आणि बँक ऑफ बडोदाच्या विलीनीकरणाला मंजुरी दिली आहे. आता विजया बँक आणि देना बँकेचे लवकरच बँक ऑफ बडोदामध्ये विलीनीकरण करण्यात येईल. बँक ऑफ बडोदाने (बीओबी) नुकताच 'शेअर स्वॅप रेशो' निश्चित केला आहे. त्यानुसार विजया बँकेच्या 1,000 शेअरच्या बदल्यात बीओबीचे 402 शेअर देण्यात येणार आहे. तर देना बँकेच्या शेअरधारकांना 1,000 शेअरच्या बदल्यात बीओबीचे 110 शेअर मिळतील. 

गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये सरकारने विजया बँक आणि देना बँकेचे बँक ऑफ बडोदामध्ये विलीनीकरण जाहीर केले होते. त्यामुळे एसबीआय आणि आयसीआयसीआय बँकेनंतर बँक ऑफ बडोदा ही देशातील तिसऱ्या क्रमांकाची मोठी बँक ठरणार आहे. 

आज (बुधवार) मुंबई शेअर बाजारात बँक ऑफ बडोदाचा शेअर 3.16 टक्क्यांच्या घसरणीसह 119.40 रुपयांवर व्यवहार करत स्तिरावला. तर, विजया बॅंक आणि देना बँकेचा शेअर अनुक्रमे 51.50 आणि 17.95 रुपयांवर बंद झाला. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BoB approves share swap ratio for merger of Vijaya Bank, Dena Bank