'हे' हेवीवेट शेअर्स पुढेही देणार तगडा परतावा, ब्रोकर हाऊसेसने सुचवलेले शेअर्स

Share Market
Share MarketSakal

लार्जकॅप म्हणेजच मोठं भांडवल असणाऱ्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये यावर्षी आतापर्यंत चांगली ॲक्शन बघायला मिळाली आहे. 30 हेवीवेट शेअर्सचा इंडेक्स म्हणजेच सेन्सेक्समध्ये सुमारे 9 टक्के आणि 50 शेअर्सचे इंडेक्स निफ्टी 50 मध्ये 11 टक्क्यांहून जास्त तेजी राहिली. निफ्टी 50 च्या 44 समभागांपैकी यावर्षी वाढ झाली आहे, फक्त 6 समभाग कमकुवत दिसले. (Broker Houses suggestion about shares)

त्यापैकी टाटा मोटर्समध्ये जवळपास 79 टक्क्यांची वाढ राहिली. याशिवाय टाटा स्टील, हिंडाल्को, एसबीआय, विप्रो, जेएसडब्ल्यू आणि ओएनजीसी हेही टॉप परफॉर्म करणाऱ्या लिस्ट मध्ये आहे. यावर्षी जास्त रिटर्न्स दिल्यानंतरही यातील काही शेअर्स पुढेही चांगली कामगिरी सुरू ठेवू शकतात. ब्रोकरेज हाऊसने या शेअर्समध्ये गुंतवणूकीचा सल्ला दिला आहे.

Share Market
नव्या PNG गॅस स्टोव्हमुळे बिलात होईल 25 टक्के बचत

टाटा स्टील (Tata Steel)

ब्रोकरेज हाऊस CLSA चा टाटा स्टीलवरील विश्वास कायम आहे. CLSA ने 1362 रुपये टारगेट ठेवून या शेअरमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. हे शेअर्स शुक्रवारी 1092 रुपयांवर स्टॉप झाले. टाटा स्टीलच्या शेअर्सने यावर्षी आतापर्यंत 70 टक्के रिटर्न्स दिले आहेत. कंपनीचे लक्ष सतत कॅश जनरेशन, कॉस्ट सेविंग्ज आणि ग्रोथवर आहे. या स्टॉकमध्ये आणखी चांगली वाढ अपेक्षित आहे.

एसबीआय (SBI)

यावर्षी एसबीआयच्या शेअर्समध्ये आतापर्यंत जवळपास 50 टक्के वाढ झाली आहे. ब्रोकरेज हाऊस मोतीलाल ओसवाल यांनी या स्टॉकमध्ये गुंतवणूकीचा सल्ला देताना 530 रुपयांचे टारगेट ठेवले आहे. सध्या हा स्टॉक 410 रुपयांच्या आसपास आहे. एसबीआयने कोविड 19 चे आव्हान चांगल्या रीतीने पार पाडले असून प्रत्येक विभागात चांगली वाढ दिसत आहे. मार्च तिमाहीत बँकेचा नफा 1 टक्क्यांनी वाढून 6451 कोटी रुपये झाला आहे. व्याज आणि इतर उत्पन्नामध्ये चांगलीच वाढ झाली आहे.

Share Market
बिल गेट्स यांच्या आवडीची 5 पुस्तकं, वाचून बघा, कदाचित तुम्हालाही यश मिळेल...

टाटा मोटर्स (Tata Motors)

टाटा मोटर्समध्ये गुंतवणूकीचा सल्ला देताना ब्रोकरेज हाऊस ICICI डायरेक्टने 405 रुपये टारगेट निश्चित केले आहे. शुक्रवारी हा शेअर 337 रुपयांच्या आसपास बंद झाला. या वर्षाबद्दल बोलायचे झाले तर टाटा मोटर्सने गुंतवणूकदारांना जवळपास 80 टक्के रिटर्न्स दिले आहेत. येत्या काही दिवसांत कंपनीला देशातील मॅक्रो रिकव्हरी, कंपनी स्पेसिफिक व्हॉल्यूम आणि मार्जिन ड्रायव्हर्सचा फायदा होईल.

हिंडाल्को (Hindalco)

ब्रोकरेज हाऊस मोतीलाल ओसवालने हिंडाल्कोवर 475 रुपयांचे टारगेट निश्चित करून गुंतवणूकीचा सल्ला दिला आहे. प्रभूदास लिलाधर यांनी शेअर्समध्ये 455 रुपयांचे टार्गेट ठेवले आहे. सध्या हा शेअर 370 रुपयांच्या जवळपास आहे. कंपनीचा तिमाही निकाल चांगला आला आहे. कंपनीचा नफा वर्षाकाठी 189 टक्क्यांनी वाढून 1928 कोटी रुपये झाला आहे. EBITDA देखील 33 टक्क्यांनी वाढून वार्षिक 5597 कोटींवर पोहोचला आहे

Share Market
मॉर्गन स्टॅनलीचं भारतीय शेअर बाजाराबाबत महत्वाचं भाकीत!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com