Share Market Today: 274 अंकांनी उसळला सन्सेक्स , निफ्टी पहिल्यांदा 13000 पार

सकाळ ऑनलाईन टीम
Tuesday, 24 November 2020

नॅशनल स्टॉक एक्सचेंज  निफ्टीमध्येही 83.50 अंकांच्या  (0.65 टक्के ) तेजीसह 13010 ने खाते उघडले. निफ्टीने पहिल्यांदाच 13000 चा आकडा पार केलाय.  

आठवड्याच्या दुसऱ्या दिवशी बाजारात शेअर बाजारातून आनंदाची बातमी आली आहे. ‘बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजच्या सेन्सेक्समध्ये 274.67 अंकांच्या उसळीसह (0.62 टक्के) 44351.82 वर उघडला. नॅशनल स्टॉक एक्सचेंज  निफ्टीमध्येही 83.50 अंकांच्या  (0.65 टक्के ) तेजीसह 13010 ने खाते उघडले. निफ्टीने पहिल्यांदाच 13000 चा आकडा पार केलाय.  

मंगळवारी शेअर बाजाराची सुरुवात चांगली झाली. निफ्टीने पहिल्यांदाच 13000 चा आकडा पार केला. आणि सन्सेक्सने   44,341 च्या विक्रमासह बाजार खुला झाला. सकाळी 9.21 वाजता सन्सेक्स (Sensex) मागील सत्राच्या तुलनेत 278.63 अंशांनी 0.63 टक्के वाढीसह 44,355.78 वर पोहचला होता. तर दुसरीकडे निफ्टी मागील सत्राच्या 83.15 अंशांनी 0.64 टक्केच्या वाढीसह 13,009.60 व्यवहार करत होता. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: bse sensex nse nifty share market opening sensex nifty green nifty above 13000