'या' आहेत सर्वाधिक तोट्यातील सरकारी कंपन्या; तर यांनी कमावला सर्वाधिक नफा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 11 फेब्रुवारी 2020

  • बीएसएनएल, एअर इंडिया, एमटीएनएल सर्वाधिक तोट्यातील सरकारी कंपन्या

मुंबई : भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल), एअर इंडिया आणि महानगर टेलिफोन निगम लिमिटेड (एमटीएनएल) या 2018-19 या आर्थिक वर्षात देशातील सर्वाधिक तोट्यातील सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्या ठरल्या आहेत. ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन (ओएनजीसी), इंडियन ऑइल कॉर्पोरेशन आणि नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन (एनटीपीसी) या देशातील सर्वाधिक नफा कमावणाऱ्या कंपन्या ठरल्या आहेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

"द पब्लिक एंटरप्रायझेस सर्व्हे 2018-19' या संसदेत सादर केलेल्या पाहणी अहवालातून ही माहिती समोर आली आहे. यात केंद्र सरकारच्या अखत्यारीत येणाऱ्या सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांच्या आर्थिक कामगिरीचा आढावा घेण्यात आला आहे. या अहवालात 2018-19 या आर्थिक वर्षासाठी सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांच्या एकूण तोट्यापैकी 94.04 टक्के तोटा होणाऱ्या आघाडीच्या 10 कंपन्यांच्या कामगिरीची माहिती देण्यात आली आहे.

खूशखबर ! या कंपनीत आहे २० हजार कर्मचाऱ्यांची मेगाभरती

या आर्थिक वर्षात तोट्यात असणाऱ्या 70 सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांच्या कामगिरीचा आढावा घेण्यात आला आहे. या आर्थिक वर्षात सर्व सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांचे एकूण उत्पन्न 24 लाख 40 हजार 748 कोटी रुपये होते. त्याआधीच्या 2017-18 आर्थिक वर्षात याच कंपन्यांनी एकूण 20 लाख 32 हजार 1 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळवले होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BSNL Air India and MTNL highest loss-making PSUs in FY19