
नवी दिल्ली : माहिती तंत्रज्ञान (आयटी) क्षेत्रातील आघाडीची कॉग्निझंट टेक्नॉलॉजी कंपनी चालू वर्षात तब्बल 20 हजार कर्मचाऱ्यांची भरती करणार आहे. कॉलेज कॅम्पसच्या माध्यमातून अभियांत्रिकी आणि विज्ञान पदवीधर विद्यार्थ्यांची निवड करण्यात येईल, असे कंपनीने म्हटले आहे.
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
सध्याच्या काळात महाविद्यालयांतून शिक्षण घेऊन बाहेर पडणारी मुले डिजिटल तंत्रज्ञानाची जाण असलेली आहेत. अशा विद्यार्थ्यांची निवड करण्याचे कंपनीचे धोरण आहे, असे "कॉग्निझंट'चे मुख्य कार्यकारी अधिकारी ब्रायन हम्फ्रीज यांनी म्हटले आहे; तसेच या वर्षी अभियांत्रिकीच्या पदवीधरांची निवड करताना "पॅकेज'मध्ये 18 टक्क्यांची वाढही करण्यात आली आहे. यामुळे कंपनीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांना किमान 4 लाखांचे वार्षिक वेतन मिळणार आहे.
Delhi Election : तिवारी म्हणाले होते 'ट्विट जपून ठेवा'; निकालनंतर होतायेत ट्रोल
कॉग्निझंटने काही दिवसांपूर्वीच जगभरात 10 ते 12 हजार कर्मचाऱ्यांची कपात करण्याचे जाहीर केले होते. मात्र, भारतातील मनुष्यबळ वाढविण्याची कंपनीची योजना आहे. गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात कॉग्निझंट 2 लाख कर्मचारी असणारी देशातील दुसरी "आयटी' कंपनी बनली होती. या यादीत टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस) आघाडीवर असून, इन्फोसिस तिसऱ्या क्रमांकावर आहे. कॉग्निझंटचे मुख्यालय अमेरिकेत आहे. त्यामुळे ती देशातील सर्वाधिक कर्मचारी असणारी बहुराष्ट्रीय कंपनी बनली आहे.