Budget 2019 : पाच लाख कोटी रुपयांची अर्थव्यवस्था साकारण्याचे उद्दिष्ट

सकाळ न्यूज नेटवर्क
Friday, 5 July 2019

आर्थिक पाहणी अहवाल अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज संसदेला सादर केला. या अहवालातील निष्कर्षांवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्‌विटद्वारे समाधान व्यक्त केले. पाच लाख कोटी रुपयांची अर्थव्यवस्था साकारण्याचे उद्दिष्ट गाठण्याचा आराखडा या अहवालातून मांडला आहे. त्याचप्रमाणे सामाजिक क्षेत्रातील प्रगती, तंत्रज्ञानाचा वाढता वापर तसेच ऊर्जासुरक्षा, याचेही फायदे अहवालातून दर्शविण्यात आल्याचे पंतप्रधानांनी म्हटले.

अर्थसंकल्प 2019 : अर्थसंकल्प अपेक्षा : नवी दिल्ली - भारतीय अर्थव्यवस्था पाच लाख कोटी रुपयांपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट साकारण्याची रूपरेषा आर्थिक सर्वेक्षण अहवालाने दर्शविली असल्याची प्रशंसा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली आहे. तर, अर्थव्यवस्थेबाबत सरकारला वाटणारी निराशा या अहवालातून झळकत असल्याचा टोला काँग्रेसने लगावला आहे.

आर्थिक पाहणी अहवाल अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज संसदेला सादर केला. या अहवालातील निष्कर्षांवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्‌विटद्वारे समाधान व्यक्त केले. पाच लाख कोटी रुपयांची अर्थव्यवस्था साकारण्याचे उद्दिष्ट गाठण्याचा आराखडा या अहवालातून मांडला आहे. त्याचप्रमाणे सामाजिक क्षेत्रातील प्रगती, तंत्रज्ञानाचा वाढता वापर तसेच ऊर्जासुरक्षा, याचेही फायदे अहवालातून दर्शविण्यात आल्याचे पंतप्रधानांनी म्हटले.

काँग्रेस नेते आणि माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी या आर्थिक पाहणी अहवालावर टीकास्त्र सोडले. मागील पाच वर्षांत अर्थव्यवस्थेने चांगली कामगिरी बजाविल्याची आत्मस्तुती अहवालात आहे. २०१९-२० मध्ये सात टक्‍क्‍यांचे विकासदराचे ढोबळ विधान केले आहे. विभागनिहाय विकासाचा मात्र काहीही अंदाज मांडलेला नाही. शिवाय, मंदावलेला विकासदर, घटलेला महसूल, वित्तीय तुटीच्या उद्दिष्टाशी तडजोड न करता आर्थिक स्रोत शोधणे, तेलाच्या वाढत्या किमतीचा चालू खात्यावर होणारा परिणाम, पंधराव्या वित्त आयोगाच्या शिफारशी, हे अहवालातील मुद्दे पाहता यात सकारात्मक किंवा प्रोत्साहन देणारे काहीही नाही, असा चिमटाही चिदंबरम यांनी काढला आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Budget 2019 Government Disappointment Report