esakal | Budget 2020:दोन तास 39 मिनिटांनंतरही अर्थमंत्र्यांचे भाषण अपुरेच! कारण...

बोलून बातमी शोधा

budget 2020 finance minister nirmala sitharaman could not read entire budget speech

निर्मला सीतारामन यांनी आजवरचं सर्वांत मोठं अर्थसंकल्पी भाषण केलं. त्यांनी दोन तास 39 मिनिटं भाषण केलं. पण, त्यानंतर त्यांची प्रकृती थोडी बिघडली. त्यां

Budget 2020:दोन तास 39 मिनिटांनंतरही अर्थमंत्र्यांचे भाषण अपुरेच! कारण...
sakal_logo
By
टीम ई-सकाळ

नवी दिल्ली : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज, संसदेत बजेट अर्थात 2020चा अर्थसंकल्प मांडला. अर्थसंकल्पात सामान्य जनतेसाठी काय आहे किंवा नाही, यापेक्षा इतर विषयांचीच चर्चा होऊ लागली आहे. निर्मला सीतारामन यांनी आजवरचं सर्वांत प्रदीर्घ अर्थसंकल्पीय भाषण केलं आणि इतकं मोठं भाषण करूनही त्याचं भाषण अपुरं राहिलंय. भारताच्या इतिहासात ही ऐतिहासिक घटना मानली जात आहे. 

बजेटच्या आणखी बातम्यांसाठी येथे ► क्लिक करा

निर्मला सीतारामन यांनी आजवरचं सर्वांत मोठं अर्थसंकल्पी भाषण केलं. त्यांनी दोन तास 39 मिनिटं भाषण केलं. पण, त्यानंतर त्यांची प्रकृती थोडी बिघडली. त्यांना घशामध्ये त्रास होऊ लागला. त्यावेळी मंत्रिमंडळातील इतर सदस्यांनी त्यांना भाषणाची पाने सांभाळून दिली. नितीन गडकरी यांनी त्यांना चॉकटेल खाण्याची विनंती केली. त्यांनी संपूर्ण भाषणात तीन वेळा पाणी पिले. पुन्हा पाणी पिल्यानंतरही फारसा फरक पडला नाही. निर्मला सीतारामन यांना केंद्रीय मंत्री हरसिमरत कौर यांनी ही मदत केली. पण, मंत्री सीतारामन यांचा आवाज पूर्णपणे बिघडला होता. त्यांना भाषण देता येत नव्हते. 

बजेटच्या आणखी बातम्यांसाठी येथे ► क्लिक करा

मुळातच अर्थसंकल्पी भाषण लांबल्यामुळं सभागृहातही थोडा गोंधळ सुरू झाला होता. त्यावेळी विरोधी पक्षातील सदस्यांनीच अर्थमंत्री सीतारामन यांना आपले भाषण सभा पटलावर ठेवण्याची विनंती केली. त्यावेळी सीतारामन यांनी 'दोनच पाने राहिली आहेत. मी वाचते', असे सांगितले. पण, त्यांना ते शक्य झाले नाहीत. अखेर त्यांनी ती दोन पाने न वाचता भाषण सभा पटलावर ठेवले. संपूर्ण अर्थसंकल्प वाचला असल्याचे समजून सभागृहाने तो मंजूर करावा, अशी विनंती त्यांनी लोकसभा अध्यक्ष ओमप्रकाश बिर्ला यांना केली. त्यांनी सभागृहातील सदस्यांची आवाजी मते घेतली आणि अर्थसंकल्प मंजूर झाला.