esakal | Budget 2020 : 'एलआयसी'बाबत सरकारचा मोठा निर्णय
sakal

बोलून बातमी शोधा

Budget 2020 Govt to sell part of its holding in LIC
  • केंद्र सरकार एलआयसीमधील हिस्सेदारी विकून भांडवल उभारणी करणार आहे.

Budget 2020 : 'एलआयसी'बाबत सरकारचा मोठा निर्णय

sakal_logo
By
वृत्तसेवा

नवी दिल्ली: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी भारतीय आयुर्विमा महामंडळाबाबत (एलआयसी) मोठा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकार एलआयसीमधील हिस्सेदारी विकून भांडवल उभारणी करणार आहे. यासाठी प्राथमिक समभाग विक्रीच्या (आयपीओ) माध्यमातून निधी उभारण्यात येणार आहे. म्हणजेच केंद्र सरकार भारतीय आयुर्विमा महामंडळाची (एलआयसी) नोंदणी शेअर बाजारात करणार आहे.

Budget 2020 : केंद्रिय अर्थसंकल्पातील महत्वाचे मुद्दे

एलआयसी ही देशातील सर्वात मोठी विमा कंपनी आहे. शिवाय एलआयसी ही देशातील सर्वात मोठी संस्थात्मक गुंतवणूकदारसुद्धा आहे. स्वच्छ, विश्वासार्ह आणि मजबूत वित्तीय क्षेत्र हे मजबूत अर्थव्यवस्थेसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

बँकिंगबाबत मोठे निर्णय: 
सरकारने याआधीच सार्जनिक क्षेत्रातील बॅंकांना 3.5 लाख कोटी भांडवली पुरवठा केला आहे. काही बॅंकांना शेअर बाजारातून भांडवल उभारण्यासाठीही प्रोत्साहन दिले जाणार आहे. 'बँक डिपॉझिट गॅरंटी' विम्याची मर्यादा एक लाख रुपयांवरून वाढवून पाच लाख करण्यात आली आहे. आयएफएससीमध्ये वित्तीय क्षेत्राचा केंद्रबिंदू बनण्याची क्षमता आहे. यात याआधीच 19 विमा कंपन्यांचा समावेश आहे. त्याशिवाय गिफ्ट सिटीमध्ये (GIFT City) इंटरनॅशनल बुलियन एक्सचेंज (सराफा बाजार) सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे सोन्याच्या व्यापारात भारताचे स्थान उंचावेल आणि नवीन रोजगार निर्मिती होऊ शकेल, अशी माहिती अर्थमंत्री सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर करताना दिली.