esakal | Budget 2020 : अर्थसंकल्पातील ठळक मुद्दे

बोलून बातमी शोधा

budget 2020 key highlights information in marathi nirmala sitharaman

नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज (शनिवार) नव्या दशकातील पहिला अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पातील ठळक मुद्दे थोडक्यात...

Budget 2020 : अर्थसंकल्पातील ठळक मुद्दे
sakal_logo
By
वृत्तसेवा

अर्थसंकल्प :
नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज (शनिवार) नव्या दशकातील पहिला अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पातील ठळक मुद्दे थोडक्यात...

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

 • भारतातील जनतेने आमच्यावर विश्वास दाखविला आणि मोदींना मोठ्या मताने निवडून दिले
 • भारतातील जनतेने आमच्यावर विश्वास दाखविला आणि मोदींना मोठ्या मताने निवडून दिले
 • जनादेशाद्वारे आम्ही लोकांची सेवा करत आहे
 • भारताच्या अर्थव्यवस्थेचा पाया मजबूत
 • मे महिन्यात मोदींना मोठा जनादेश मिळाला
 • देशाच्या आकांक्षेचा हा अर्थसंकल्प आहे
 • आमचे लक्ष्य देश आणि नागरिकांची सेवा आहे
 • जीएसटी हे देशासाठी ऐतिहासिक पाऊल आहे
 • जीएसटीचे पाऊल ऐतिहासिक, इन्स्पेक्टर राज मोडीत काढले
 • जीएसटीने आता पाळेमुळे मजबूत केली आहेत
 • जीएसटी लागू करून रचनात्मक बदल केले
 • वस्तू व सेवा करांची मोठी मदत होत आहे
 • सबका साथ, सबका विकास यामुळे देशातील प्रत्येक गरिब नागरिकांपर्यंत योजना पोहचत आहेत
 • जीएसटीमुळे 60 लाख नवीन करदाते जोडले गेले 
 • प्रणालीद्वारे 800 कोटी नवीन इन्व्हॉईस भरले गेले
 • अरुण जेटली जीएसटीचे मुख्य शिल्पकार आहेत
 • 40 लाख नागरिक जीएसटी परतावा भरतात
 • गरीब आणि गरजूंना डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर योजनेद्वारे फायदा पोचवला. उदा. आयुषमान भारत योजना, उज्ज्वला योजना
 • महागाई नियंत्रणात ठेवण्यात सरकारला यश आले
 • रोजगार देण्याचा प्रयत्न सरकार करत आहे
 • बँकाची स्थिती चांगली आहे
 • महागाई नियंत्रणात असून, बँकांना भांडवल पुरवठा करून अर्थव्यवस्थेला बळ देण्यात आले