esakal | Budget 2020:दौलतीसाठी सरकारकडून 'सवलत' झाली छोटी

बोलून बातमी शोधा

Budget

हे झालं स्वस्त

 • इलेक्ट्रिक मोटारी
 • घरे
 • साबण, डिटर्जंट, शाम्पू, 
 • तेल, टूथपेस्ट
 • पंखे, दिवे
 • प्रवासी बॅगा
 • भांडी
 • चष्माच्या फ्रेम
 • गाद्या

हे झालं महाग

 • सोने
 • काजू
 • चांदी व चांदीचे दागिने
 • स्टेशनरी 
 • ऑप्टिकल फायबर
 • सीसीटीव्ही कॅमेरे
 • वातानुकूलन यंत्रणा
Budget 2020:दौलतीसाठी सरकारकडून 'सवलत' झाली छोटी
sakal_logo
By
सकाळन्यूजनेटवर्क

अर्थसंकल्प 2020 : नवी दिल्ली - देशाच्या अर्थकारणावर मंदीचे मळभ दाटले असतानाच केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मोदी सरकारचा २०२०-२१ साठीचा अर्थसंकल्प सादर करत शिवार ते शहर अशी सवलतींची भरघोस पेरणी केली.  मध्यमवर्गीयांच्या खिशाप्रमाणेच बाजारातही अधिकचा पैसा यावा म्हणून करपद्धतीमध्ये बदल करण्यात आला खरा, पण कराचे टप्पे बदलणाऱ्यांना करवजावट आणि सवलतींना मुकावे लागेल. बळिराजाला बळ देणारा सोळा कलमी कार्यक्रम,  बॅंकांतील पाच लाख रुपयांपर्यंतच्या ठेवींना विमा कवच, एलआयसीतील हिस्सेदारी विकून भांडवलाची उभारणी, काॅर्पोरेट करांत कपात, छोट्या उद्योगांची ऑडिटच्या परीक्षेतून मुक्तता, स्टार्टअपला बूस्टर, अशा अनेकविध घोषणांचा पाऊसच अर्थमंत्र्यांच्या प्रदीर्घ भाषणात पडला.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

महाराष्ट्राला काय?
केंद्रीय गृहनिर्माण व नगर विकास विभागांतर्गत 
नागपूर मेट्रो प्रकल्प
 

 • परदेशी कर्ज  १२८.७० दक्षलक्ष युरो
 • केंद्राकडून २०२०-२१ साठी ३०० कोटींची तरतूद
 • अर्थसंकल्प २०१९-२० मध्ये आर्थिक तरतूद २८० कोटी

पुणे मेट्रो प्रकल्पासाठी  

 • फ्रान्स सरकारकडून २४५ दशलक्ष युरो कर्ज 
 • केंद्राकडून वर्ष २०२०-२१ साठी ५०० कोटींची तरतूद
 • अर्थसंकल्प २०१९-२० मध्ये आर्थिक तरतूद ५०० कोटी

रेल्वे मंत्रालय 

 • मुंबई-अहमदाबाद द्रुतगती रेल्वेसाठी  
 • जपानकडून १,५०,००० दशलक्ष जपानी येन कर्ज 
 • केंद्राकडून २०२०-२१ साठी ११० कोटींची तरतूद
 • अर्थसंकल्प २०१९ -२० मध्ये आर्थिक तरतूद १०० कोटी

आयुष मंत्रालय

 • राष्ट्रीय प्राकृतिक चिकित्सा संस्थान, पुणे 
 • केंद्राकडून २०२०-२१ साठी १९.४७ कोटींची तरतूद
 • अर्थसंकल्प २०१९-२० मध्ये आर्थिक तरतूद पाच कोटी

ठळक तरतुदी

 • गृहनिर्माण आणि नगरविकास - ५०,०४०
 • आरोग्य आणि कुटुंब कल्याण - ६७,११२
 • रेल्वे - ७२,२१६
 • रस्ते वाहतूक आणि महामार्ग - ९१,८२३
 • मनुष्यबळ विकास - ९९,३१२
 • ग्रामविकास - १,२२,३९८
 • अन्न आणि नागरी पुरवठा - १,२४,५३५
 • कृषी आणि शेतकरी - १,४२,७६२
 • गृह विभाग - १,६७,२५०
 • संरक्षण - ४,७१,३७८

(आकडे कोटी रुपयांत)