Budget 2023 : अर्थसंकल्पात वापरल्या जाणाऱ्या 'या' शब्दांचा अर्थ तुम्हाला माहितीये का? जाणून घ्या

अर्थमंत्री निर्मला सीतारामन 1 फेब्रुवारी 2023 रोजी पाचव्यांदा देशाचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत.
Budget 2023
Budget 2023 Sakal

Budget 2023 : अर्थसंकल्प हा देशाच्या विकासाची दिशा ठरवत असते. यंदाचा अर्थसंकल्प अनेक अर्थांनी वेगळा असणार आहे, असे अर्थसंकल्पाशी संबंधित जाणकारांचे म्हणणे आहे.

यावेळी सरकार काही क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करणार आहे, परंतु तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, अर्थसंकल्पाशी संबंधित काही शब्दांचा अर्थ स्पष्ट सांगण्यास अनेकजन गोंधळतात. म्हणून आज आम्ही तुम्हाला अर्थसंकल्पाशी संबंधित सर्व शब्दांचे/ संकल्पनांचे अर्थ सांगणार आहोत.

बॅलन्स ऑफ पेमेंट (Balanced budget) :

देश आणि उर्वरित जग यांच्यातील आर्थिक व्यवहारांच्या लेखाजोखाला बॅलन्स ऑफ पेमेंट म्हणतात.

संतुलित बजेट (Balanced budget) :

केंद्रीय अर्थसंकल्प हे समतोल अर्थसंकल्प असावे असे म्हटले जाते. जेव्हा चालू उत्पन्न चालू खर्चाच्या समान असते त्यावेळी अशा बजेटला संतुलित बजेट म्हटले जाते.

अर्थसंकल्पीय तूट (Budgetary deficit) :

जेव्हा तुमचा खर्च प्राप्त झालेल्या महसुलापेक्षा जास्त असतो तेव्हा अशी परिस्थिती उद्भवते त्याला अर्थसंकल्पीय तूट असे म्हणतात.

बाँड (Bond) :

हे कर्जाचे प्रमाणपत्र आहे जे सरकार किंवा कॉर्पोरेशन पैसे उभारण्यासाठी जारी करते. यावर व्याज मिळते.

हेही वाचा : जगायचं कसं हे सांगण्यासाठी हवं 'लिव्हिंग विल'

सेनव्हॅट (CENVAT):

हा केंद्रीय मूल्यवर्धित कर आहे, जो निर्मात्यावर लादला जातो. ही संज्ञा 2000-2001 मध्ये सादर करण्यात आली.

कॉर्पोरेट कर (Corporate tax) :

अशा प्रकारचा कर कॉर्पोरेट संस्था किंवा फर्मवर लादला जातो, ज्याद्वारे सरकारला उत्पन्न मिळते. जीएसटी लागू झाल्यानंतर ही कर प्रणाली संपुष्टात आली आहे.

चालू खात्यातील तूट (Current account deficit):

अशी तूट राष्ट्रीय आयात आणि निर्यात यांच्यातील फरक दर्शवते.

Budget 2023
Budget 2023 : जाणून घ्या, अर्थसंकल्पाशी संबंधित महत्वाच्या ऐतिहासिक घटना

राजकोषीय तूट (Fiscal deficit) :
हा सरकारचा एकूण खर्च आणि महसुली प्राप्ती आणि कर्ज नसलेल्या भांडवली पावत्या यांच्यातील फरक आहे.

जीडीपी (GDP) :
एका आर्थिक वर्षात देशाच्या सीमेमध्ये उत्पादित एकूण वस्तू आणि सेवांची बेरीज आहे.

वित्त बिल (Finance bill) :

हे सरकारने प्रस्तावित केलेल्या नवीन कराचे वर्णन आहे, त्यात सध्याच्या करातील काही सुधारणांचाही समावेश आहे.

आयकर (Income tax):
ते तुमच्या उत्पन्नाच्या स्रोतांवर जसे की उत्पन्न, गुंतवणूक आणि त्यावर मिळणारे व्याज यावर आकारले जाते.

अप्रत्यक्ष कर (Indirect taxes) :

उत्पादन शुल्क, सीमा शुल्क आणि सेवा शुल्क याद्वारे उत्पादित वस्तू आणि आयात-निर्यात केलेल्या वस्तूंवर ते आकारले जाते.

प्रत्यक्ष कर (Direct taxes) :

व्यक्ती आणि संस्थांचे उत्पन्न आणि त्याचा स्रोत आयकर, कॉर्पोरेट कर, भांडवली नफा कर आणि वारसा कर याद्वारे आकारला जातो.

उत्पादन शुल्क (Excise duties) :

देशाच्या हद्दीत उत्पादित केलेल्या सर्व उत्पादनांवर लावलेला कर. उत्पादन शुल्क देखील जीएसटीमध्ये समाविष्ट करण्यात आले आहे.

सीमा शुल्क (Customs duties) :
देशात आयात केलेल्या किंवा देशाबाहेर निर्यात केलेल्या वस्तूंवर (विशेष उत्पादने) शुल्क आकारले जाते.

निर्गुंतवणूक (Disinvestment):

अधिक महसूल मिळवण्यासाठी संस्थेचा किंवा सरकारच्या मालकीचा काही भाग विकण्याची प्रक्रिया म्हणजे निर्गुंतवणूक.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com