Income Tax: नवीन वर्षात करदात्यांना मोठा दिलासा; उत्पन्नावर लागणार फक्त 5% कर, अर्थमंत्र्यांचे आदेश!

नवीन वर्षात करदात्यांना आनंदाची बातमी आहे.
Nirmala Sitharaman
Nirmala Sitharamansakal

Income Tax : नवीन वर्षात करोडो करदात्यांना आनंदाची बातमी आहे. तुम्हीही इन्कम टॅक्स भरत असाल तर आतापासून तुम्हाला फक्त 5% टॅक्स भरावा लागेल. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नवीन वर्षात लोकांना मोठी भेट दिली आहे.

देशभरात अर्थसंकल्पाची तयारी जोरात सुरू आहे, अशा स्थितीत मध्यमवर्गीयांपासून नोकरदारांपर्यंत सर्वांनाच यावेळी करसवलतीची मोठी अपेक्षा आहे.

माहिती देताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले की, आतापासून अनेकांना फक्त 5% कर भरावा लागेल. तुम्ही नवीन करप्रणाली स्वीकारा किंवा जुनी करप्रणाली, पण आता तुम्हाला जास्त कर भरावा लागणार नाही.

हेही वाचा : Inside Online Dating : हुक अप्स, ओपन रिलेशनशिप्स की...; महाराष्ट्रातील तरुणाई नक्की काय शोधते?

2.5 लाख ते 5 लाखांपर्यंत उत्पन्न असलेल्या करदात्यांना 5 टक्के दराने कर भरावा लागेल. करदात्यांना यापेक्षा जास्त कर भरावा लागणार नाही. जर तुमचे उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असेल तर तुम्हाला एक रुपयाही कर भरावा लागणार नाही.

करमुक्त उत्पन्नाचा स्लॅब वाढू शकतो

बजेटमध्ये सरकार करमुक्त उत्पन्नाची व्याप्ती वाढवू शकते. सध्या लाखो लोकांना फक्त 2.5 लाख रुपयांपर्यंतच करमाफीचा लाभ मिळतो. ही मर्यादा 3 ते 5 लाखांपर्यंत वाढवली जाऊ शकते. यावेळी सरकार करोडो करदात्यांना मोठा लाभ देऊ शकते.

Nirmala Sitharaman
LPG Price Hike : वर्षाच्या पहिल्याच दिवशी सर्वसामान्यांना झटका! गॅस सिलिंडरच्या दरात वाढ

शेवटचा बदल 2014 मध्ये झाला होता

2014 मध्ये सरकारने कर मर्यादा वाढवली होती. यापूर्वी ही मर्यादा 2 लाख रुपये होती, ती वाढवून 2.5 लाख रुपये करण्यात आली आहे. सरकारच्या या निर्णयामुळे लोकांना गुंतवणुकीसाठी अधिक पैसे मिळतील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com