budget 2023  fm Nirmala Sitharaman on kyc digital india digital library e court saving scheme farmers digilocker
budget 2023 fm Nirmala Sitharaman on kyc digital india digital library e court saving scheme farmers digilocker

Budget 2023 : डिजिटल लायब्ररी, KYC अन् पॅन कार्डबाबत अर्थमंत्र्यांच्या महत्वाच्या घोषणा, वाचा सविस्तर

Union Budget 2023 : अर्थसंकल्प २०२३ आज संसदेत सादर करतेवेळी अर्थमंत्री निर्मला सीतीरामन यांनी डिजीटल इंडिया आणि ग्रामीण भारताच्या विकासााठी अनेक घोषणा केल्या आहेत. गावांमध्ये डिजीटल लायब्ररीसह गावांमधी तंटे लवकर सोडवण्याकरिता कोर्ट यासारख्या घोषणा केल्या आहेत.

अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्प सादर करताना शेतीच्या विकासासाठी आणि प्रगत तंत्रज्ञानासाठी डिजीटल ट्रेनिंग देण्यात येईल. तसेच सहकारी बँकाचे संगणीकरण करणअयात येईल. तसेच सहकारी सोसायटींचा डेटाबेस देखील तयार केला जाईल.

डिजीटल लायब्ररी

लहान मुले तसेच तरुणांना शिक्षणिक सुविधा मिळाव्यात यासाठी डिजीटल लायब्ररी तयार करण्यात येईल. वॉर्ड आणि पंचायच स्तरावर या लायब्रेरी उपलब्ध असतील. यामध्ये प्रादेशिक आणि इंग्रजी भाषेतील पुस्तके उपलब्ध असतील. यामध्ये वयोमानानुसार पुस्तके उपलब्ध असणार आहेत.

budget 2023  fm Nirmala Sitharaman on kyc digital india digital library e court saving scheme farmers digilocker
Budget 2023 : निर्मला सीतारामन यांची 'पॅन कार्ड'बाबत मोठी घोषणा, आता…

व्हिडीओ केवायसी

जन-धन योजनेचे बँक खाते उघडण्याकरिता केवायसी प्रक्रिा व्हिडीओ कॉलच्या मध्यामातून पूर्ण करता येणार आहे.येत्या काळात व्हिडीओ केवायसीला प्रोत्साहन दिले जाईल अशी घोषणा अर्थमंत्र्यांनी केली आहे. तसेच पॅन कार्ड हे सरकारी एजन्सीजच्या डिजीटल सिस्टीमसाठी ओळख म्हणून ग्राह्य धरण्यात येणार आहे. ओळखीचा पुरावा म्हणून आता पॅन कार्ड वापरता येार आहे. यामुळे अनेक उद्योजकांना फायदा होणार आहे.

budget 2023  fm Nirmala Sitharaman on kyc digital india digital library e court saving scheme farmers digilocker
Union Budget 2023: मध्यमवर्गीयांसाठी खूशखबर! आता सात लाखांपर्यंत इन्कम टॅक्स नाही; अर्थमंत्र्यांची घोषणा

सीतारामन यांनी सांगितले की, PAN सरकारी एजन्सीच्या सर्व डिजिटल प्रणालींसाठी एक कॉमन ओळखपत्र म्हणून वापरले जाईल. तसेच केवायसी प्रोससे सोपी करण्यासाठी डिजिलॉकर आणि आधारचा वापर KYC गरजा पूर्ण करण्यासाठी एक-स्टॉप सोल्यूशन म्हणून केला जाईल असे सीतारामन यांनी त्यांच्या बजेट भाषणात सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com