रिलायन्स इंडस्ट्रीज 7 सप्टेंबरला देणार बोनस शेअर

पीटीआय
बुधवार, 6 सप्टेंबर 2017

मुंबई: रिलायन्स इंडस्ट्रीजचा शेअर गेल्या आठ दिवसात 8 टक्क्यांनी वधारला आहे. रिलायन्सच्या जिओसाठी तब्बल 60 लाख जिओ फोनची नोंदणी झाली आहे. एक कोटीहून अधिक जिओ ग्राहकांनी जिओ फोनच्या खरेदीसाठी उत्सुकता दाखवल्याचे बोलले जात आहे. दरम्यान पहिल्याच दिवशी 60 लाख फोनची बुकिंग झाल्याचा दावा या फोनचे वितरण करणाऱ्या रिलायन्स रिटेलने केला आहे. रिलायन्स जिओच्या वाढत्या फोनच्या मागणीमुळे रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअरमध्ये सतत वाढ सुरुच आहे. कंपनीचे बाजार भांडवल 5.22 लाख कोटींवर पोचले आहे.

रिलायन्स इंडस्ट्रीजच्या 21 जुलै रोजी झालेल्या वार्षिक सर्वसाधारण बैठकीत मुकेश अंबानी यांनी रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअरधारकांना एकास-एक बोनस शेअर देण्याची घोषणा केली होती. आता येत्या 7 सप्टेंबरला रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअरधारकांना एकास-एक बोनस मिळणार आहे. कंपनीने 7 सप्टेंबर तारीख एक्स-बोनस म्हणून जाहीर केली आहे.

आज (बुधवार) मुंबई शेअर बाजारात रिलायन्स इंडस्ट्रीजचा शेअर 14 रुपयांनी वधारून 1647 रुपयांवर व्यवहार करत बंद झाला.

Web Title: business news Reliance Industries