Gautam Adani : अदानी कर्जात बुडालेत? संपत्तीत एका दिवसात 54 हजार कोटींची घट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Gautam Adani

Gautam Adani : अदानी कर्जात बुडालेत? संपत्तीत एका दिवसात 54 हजार कोटींची घट

Gautam Adani : बुधवारी शेअर बाजारात मोठी घसरण दिसून आली पण मार्केटमध्ये अदानी समूहातील कंपन्याच्या शेअर्समध्ये झालेली घसरण विशेष लक्षवेधी होती. अदानीच्या तब्बल ९ कंपन्यांच्या शेअर्समध्ये झालेल्या घसरणीने बुधवारचा शेअर मार्केट चांगलाच चर्चेत राहला. या घसरणीमुळे गुंतवणूकदारांचे तर मोठे नुकसान झाले सोबत अदानींच्या संपत्तीत सात अब्ज डॉलरची घट झाल्याचे समोर आले आहेत.

यावर अमेरिकेतील Hindenburg Research LLC  ने अदानी ग्रुपबाबत जाहीर केलेल्या एका अहवालामध्ये धक्कादायक खुलासा केलाय. आज आपण या विषयीच जाणून घेणार आहोत. (Gautam Adani group lost seven billion dollar in a day share market )

अदानी ग्रुपच्या कंपन्यांच्या शेअरमध्ये झालेल्या घसरणीमुळे फक्त गुंतवणूकदाराच फटका बसला नाही तर गौतम अदानी यांच देखील नुकसान झालंय. अदानी यांच्या संपत्तीत एका दिवसात 6.5 अब्ज डॉलरची म्हणजेच 54000 कोटी रुपयांची घट झाली आहे.

हेही वाचा: Adani Group News : अदानी समूहाचा काँग्रेसशासित सरकारसोबत मोठा करार; 'या' कंपनीतील 50% हिस्सा...

Hindenburg Research चा अहवाल काय म्हणतो?

Hindenburg Research च्या अहवालात अदानी ग्रुपविषयी धक्कादायक खुलासा केलाय. अदानी ग्रुप मोठ्या कर्जामुळे दबाबाखाली येण्याची शक्यता असल्याचं या अहवालात म्हटलंय. अदानी समूहाने शेअर दरात वाढ करण्यासाठी फेरफार केल्याचा आणि मॅनिप्युलेशन आणि अकाउंटिंग फ्रॉडचा आरोपही याअहवालात करण्यात आलाय.

हेही वाचा: Gautam Adani News : आधी वीज, मग गॅस, आता गौतम अदानी पोहोचवणार प्रत्येक घरात...

Hindenburg Research च्या अहवालासंदर्भात अदानी ग्रुपचं काय म्हणतो?

Hindenburg Research च्या अहवालात केलेले आरोप अदानी ग्रुपने फेटाळून लावले. कोणतही तथ्य न तपासता हा अहवाल प्रकाशित केल्याचा आणि अदानी ग्रुपची बदनामी केल्याचा आरोप अदानी ग्रुपने केलाय.