कर्मचाऱ्यांना लागली लॉटरी; बॉसच्या एका निर्णयाने झाले करोडपती!

सकाळ ऑनलाईन टीम
Friday, 27 November 2020

द हट ग्रुप असं कंपनीचे नाव आहे. या कंपनीचे मालक आहेत मॅथ्यू मोल्डिंग. मॅथ्यू यांनी कंपनीच्या प्रॉफिटमधील 830 मिलियन पौंड म्हणजेच जवळपास 8 हजार 183 कोटी रुपयांचे शेअर्स कंपनीच्या कर्मचाऱ्यांना देऊन टाकले. त्यांनी एक बायबॅक स्कीम सुरू केली आणि सर्व कर्मचाऱ्यांसाठी ओपन स्कीम होती. 

सध्या ब्रिटनच्या एका बिझनेसमनची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. त्याचं कारणंही तसंच आहे. बिझनेसमनने कंपनीचे प्रॉफिट शेअर्स कर्मचाऱ्यांना दिले आङेत. त्यामुळे कंपनीचे अनेक कर्मचारी करोडपती बनले. कंपनीचे शेअर्स ज्यावेळी वेगाने वाढत होते त्यावेळी कंपनीला जास्त फायदा झाला आणि कंपनीच्या बॉसने शेअर्स कर्मचाऱ्यांना देण्याचा निर्णय घेतला.

द हट ग्रुप असं कंपनीचे नाव आहे. या कंपनीचे मालक आहेत मॅथ्यू मोल्डिंग. मॅथ्यू यांनी कंपनीच्या प्रॉफिटमधील 830 मिलियन पौंड म्हणजेच जवळपास 8 हजार 183 कोटी रुपयांचे शेअर्स कंपनीच्या कर्मचाऱ्यांना देऊन टाकले. त्यांनी एक बायबॅक स्कीम सुरू केली आणि सर्व कर्मचाऱ्यांसाठी ओपन स्कीम होती. 

कंपनीने सुरू केलेल्या योजनेचा त्या कर्मचाऱ्यांना फायदा झाला ज्यांनी कधी असा विचारही केला नव्हता. कर्मचाऱ्यांची निवड त्यांच्या व्यवस्थापकांनी केली होती आणि यादी मॅथ्यू यांच्याकडे पाठवण्यात आली होती. या योजनेचा फायदा कंपनीत चालक म्हणून काम करणाऱ्यापासून ते मॅथ्यू यांच्या पीएपर्यंत अनेकांना झाला. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

ब्रिटिश वृत्तपत्र मिररशी बोलताना मॅथ्यू मोल्डिंग यांनी सांगितलं की, मी सर्वांमध्ये कंपनीला झालेला फायदा वाटू इच्छित होतो. यासाठी ही योजना सरू केली. सर्वांना खूप सारे पैसे मिळाले. याविरोधात लोक काही ना काही बोलत होते पण मला विश्वास होता की शेअर्स वरती जातील. 

द हट ग्रुप एक ई कॉमर्स बिझनेस आहे. मॅथ्यू मोल्डिंग हे फिटनेस प्रेमी आहेत. त्यांना अनेक बिझनेस अवॉर्ड मिळाले आहेत. मॅथ्यू यांनी 2004 मध्ये जॉन गॅलमोरसोबत द हट ग्रुपची स्थापना केली होती. गेल्या 16 वर्षांपासून ते या कंपनीच्या माध्यमातून मॅथ्यू यांना बरीच संपत्ती मिळाली आहे. मॅथ्यू यांनी त्यांच्या शेअऱ होल्डर्सना 1.1 बिलियन म्हणजेच जवळपास 8 हजार 122 कोटी रुपयांचा बोनस दिल्याचं म्हटलं जात आहे. 

स्मार्ट वॉच करणार तुमच्या आरोग्याची तपासणी

द हट ग्रुपने शेअरधारकांना हा बोनस तेव्हा दिला जेव्हा कंपनीचे शेअर्स वरती गेले. कंपनीला तब्बल 63 हजार 505 कोटींचा फायदा झाला आणि तोसुद्धा फक्त 15 दिवसांच्या आत. जगभरातील 164 देशांमध्ये कंपनी काम करत आहे. यावर्षी सप्टेंबर महिन्यात मॅथ्यू मोल्डिंग यांना फोर्ब्सने अब्जाधीशांच्या यादीत पहिल्यांदा टाकलं आहे. शेअर्सच्या स्कीमने कंपनीचे जवळपास 200 हून अधिक कर्मचारी करोडपती बनले आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: businessman matthew moulding gives share of profits to employees become millionaires