वर्ष संपण्याआधी खरेदी करा 'हे' 6 मिडकॅप्स शेअर्स!

मिडकॅप सेगमेंटमध्ये गुंतवणूक करण्यासाठी तुम्ही चांगले शेअर्स शोधत असाल, तर आम्ही तुमच्यासाठी 6 शेअर्सची लिस्ट घेऊन आलो आहोत.
Midcap Stocks
Midcap Stockssakal
Summary

मिडकॅप सेगमेंटमध्ये गुंतवणूक करण्यासाठी तुम्ही चांगले शेअर्स शोधत असाल, तर आम्ही तुमच्यासाठी 6 शेअर्सची लिस्ट घेऊन आलो आहोत.

Best Midcap Stocks : शुक्रवारी मिडकॅप शेअर्सवर दबाव दिसून आला. पण मिडकॅपच्या बाबतीत येत्या काळात चांगल्या तेजीची शक्यता आहेत. मॅक्रो फ्रंटवर, आकडे चांगले येत आहेत सोबतच मागणी वाढत आहे. त्यामुळे येत्या काळात मिडकॅप कंपन्यांची कामगिरी चांगली होऊ शकते. नुकत्याच झालेल्या घसरणीनंतर आता हे शेअर्स घेण्याची संधी आहे. या लिस्टमध्ये करिअर पॉइंट (Career Point), स्नोमॅन लॉजिस्टिक (Snowman Logistics), सोलर इंडस्ट्रीज (Solar Industries), आयओएल केमिकल्स (IOL Chemicals), एमएमटीसी (MMTC) आणि रॅडिको खेतान (Radico Khaitan) यांचा समावेश आहे.

Midcap Stocks
गुंतवणुकीसाठी 6 दर्जेदार मिडकॅप्स! काय सांगताहेत शेअर बाजार तज्ज्ञ

- शेअर बाजार तज्ज्ञ अंबरिश बलिगा यांची निवड

लॉन्ग टर्म: करिअर पॉइंट (Career Point)

अंबरीश बालिगा यांनी करिअर पॉइंटमध्ये लॉन्ग टर्मसाठी गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. शेअरसाठी 180 रुपये टारगेट देण्यात आले आहे. वाढत्या स्पर्धेमुळे गेल्या 4 - 5 वर्षांत ग्रोथ कमजोर राहिली आहे. पण आगामी काळात चांगली वाढ अपेक्षित आहे. कंपनीची एकूण संपत्ती 474 कोटी आहे तर 240 कोटी मार्केट कॅप आहे

पोझिशनल: स्नोमॅन लॉजिस्टिक्स (Snowman Logistics)

स्नोमॅन लॉजिस्टिकमध्ये अंबरीश बालिगा यांनी पोझिशनल पिक म्हणून शिफारस केली आहे. या शेअरसाठी 50 रुपये टारगेट देण्यात आले आहे. हा एक मोठा लॉजिस्टिक प्लेयर असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. कंपनी 17 शहरांमध्ये कार्यरत आहे. महसूल फार्मा क्षेत्रातून 50% येतो. येत्या 2 वर्षांत कंपनीमध्ये मजबूत वाढ अपेक्षित आहे.

Midcap Stocks
'हे' 6 मिडकॅप्स शेअर्स देतील भरघोस परतावा, तुमच्याकडे आहेत का?

शॉर्ट टर्म: सोलर इंडस्ट्रीज (Solar Industries)

अंबरिश बालिगा यांनी सोलर इंडस्ट्रीजमध्ये अल्प शॉर्ट टर्मसाठी गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. या शेअरसाठी 2700 रुपये टारगेट देण्यात आले आहे. कंपनीची उत्पादने संरक्षण आणि खाणकामा व्यतिरिक्त पायाभूत सुविधांमध्ये वापरली जातात. कंपनीची केंद्र देशभरात 25 ठिकाणी आहेत. कंपनीची ऑर्डर बुक मजबूत आहे.

- जय ठक्कर यांची निवड

लॉन्ग टर्म: आयओएल केमिकल्स (IOL Chemicals)

जय ठक्कर यांनी IOL केमिकल्सवर लाँग टर्मसाठी गुंतवणुकीचा सल्ला दिला आहे. या शेअरसाठी 718 रुपयांचे टारगेट देण्यात आले आहे. तर 329 रुपयांवर स्टॉप लॉस ठेवण्याचा सल्ला दिला आहे.

Midcap Stocks
SPIC शेअर्स येत्या 3 महिन्यांत देणार 36 टक्के नफा!

पोझिशनल: एमएमटीसी (MMTC)

जय ठक्कर यांनी एमएमटीसीमध्ये पोझिशनल पिक म्हणून गुंतवणुकीची शिफारस केली आहे. शेअरसाठी 74 रुपये टारगेट देण्यात आले आहे. तर 34 रुपयांवर स्टॉप लॉस ठेवण्याचा सल्ला दिला आहे.

शॉर्ट टर्म: रॅडिको खेतान (Radico Khaitan)

जय ठक्कर यांनी रॅडिको खेतानमध्ये शॉर्ट टर्मसाठी गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. शेअरसाठी 1350 रुपये आणि 1400 रुपये असे 2 टारगेट देण्यात आले आहेत. तर 1080 रुपयांवर स्टॉप लॉस ठेवण्याचा सल्ला दिला आहे.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com