Zomato: झोमॅटोचे शेअर्स खरेदी करा; मिळेल 60% पर्यंत परतावा | Share Market | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

zomato

Zomato: झोमॅटोचे शेअर्स खरेदी करा; मिळेल 60% पर्यंत परतावा

शेअर बाजारात कमजोरीचे वातावरण असताना झोमॅटोचा (Zomato) स्टॉक आज (21 सप्टेंबर 2022) वाढीसह व्यापार करत आहे. झोमॅटोच्या शेअरमध्ये बीएसईवर 1.83 टक्क्यांनी वाढ झाली आहे. ग्लोबल ब्रोकरेज फर्म जेफरीज स्टॉकबाबत सकारात्मक दिसत आहे. जेफरीजने झोमॅटोम्ये (Zomato) खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तसेच टारगेट 100 रुपये प्रति शेअर ठेवण्यात आले आहे. म्हणजेच हा स्टॉक आणखी 60 टक्क्यांपर्यंत जाऊ शकतो.

मॅनेजमेंट क्विक कॉमर्स बिझनेसबाबत सकारात्मक असल्याचे जागतिक ब्रोकरेज हाऊस जेफरीजचे म्हणणे आहे. लॉन्‍ग टर्म गुंतवणुकदारांनी झोमॅटोचे स्टॉक्स खरेदी केल्यास चांगला नफा कमावता येईल असे जेफरीजचे म्हणणे आहे.

हेही वाचा: Stock: या स्मॉल कॅप स्टॉकचा 3 वर्षात 111% परतावा, आता देणार 100% डिव्हिडेंड

60% पर्यंत परतावा
जेफरीजने झोमॅटोच्या शेअर्सवर 'बाय' रेटींग दिले आहे आणि 100 रुपयांचे टारगेट निश्चित केले आहे. 20 सप्टेंबर 2022 रोजी स्टॉक 62.85 रुपयांवर बंद झाला होता, म्हणजेच या किंमतीपासून स्टॉकमध्ये 60 टक्क्यांपर्यंत परतावा मिळू शकतो.

हेही वाचा: Share Market : 100 रुपयांपेक्षा कमी किंमतीचा हा शेअर तज्ज्ञांचा फेव्हरेट

रेकॉर्ड हायवरून 63% घसरण
झोमॅटो लिमिटेडच्या शेअरची लिस्टींग 23 जुलै 2021 ला झाली. आयपीओची किंमत 76 रुपये होती, पण हा शेअर 115 रुपयांवर लिस्ट झाला. त्याच वेळी, लिस्टिंगच्या दिवशी, तो 66% च्या प्रीमियमसह 126 रुपयांवर बंद झाला. लिस्टिंग केल्यानंतर, 16 नोव्हेंबर 2021 रोजी स्टॉकने 169 रुपयांच्या विक्रमी उच्चांक गाठला. मात्र, त्यानंतर त्यात करेक्शन झाले आहे. 20 सप्टेंबर 2022 रोजी स्टॉक 62.85 रुपयांवर बंद झाला. अशा प्रकारे, स्टॉकमध्ये विक्रमी उच्चांकावरून 63% सुधारणा झाली आहे.

हेही वाचा: Stock Market : या डिफेन्स स्टॉकचा मजबूत परतावा, आणखी तेजी येणार ?

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

Web Title: Buy Zomato Shares Will Give You 60 Percent Return In Share Market

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..