
प्रमुख कंपन्याच्या कार विक्रीत 20 टक्क्याने वाढ, महिनाभरात अडीच लाख कार विक्री
मुंबई, ता.2 : लॉकडाऊनमुळे वाहन क्षेत्राची थांबलेली गती, वर्ष सरतासरता पुन्हा जागेवर आली आहे. डिसेंबर महिन्यात सहा आघाडीच्या कंपन्यांनी तब्बल अडीच लाख कार विकल्या आहेत. या महिन्यात कोविड पुर्व काळापेक्षा 44 हजार वाहने जादा विकली गेली, हे विषेश. डिसेंबरमध्ये देशातील आघाडीच्या सहा आघाडीच्या कार उत्पादक कंपन्यांनी कार विक्रीत 20 टक्के वाढ नोंदवली आहे. सण, उस्तवामुळे वाहनांच्या खरेदीत वाढ झाल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे, मात्र नव्या वर्षात वाहन क्षेत्रापुढील आव्हाने कायम आहे.
हुंडाई आणि मारुती सुझुकी या कंपन्यांच्या विक्रीत प्रत्येकी 24.9 आणि 12.6 एवढी वाढ नोंदवली आहे. डिसेंबर महिन्यात मारुती सुझुकीने 1,40,755 कार विक्रीची नोंद केली, तर डिसेंबर 2019 मध्ये कंपनीने 1,22,784 कारची विक्री केली. हुंडाई मोटर्सने या महिन्यात 47,400 वाहने विकली, 2019 मध्ये याच महिन्यात हुंडाईने 37,953 कार विक्री केल्या होत्या. टाटा मोटर्सने वाहन विक्रीमध्ये 84 टक्के एवढी घसघसशीत वाढ नोंदवली आहे. कंपनीने डिसेंबरमध्ये 23,545 प्रवासी वाहने विकू शकली. तर टोयाटा किर्लोस्करच्या विक्रीत 14.4 टक्के वाढ झाली आहे.
महत्त्वाची बातमी : बॉयफ्रेंडला मैत्रिणीसोबत आक्षेपार्ह स्थितीत पाहिलं, बाचाबाचीनंतर 19 वर्षीय तरुणीची तिच्याच बॉयफ्रेंडकडून हत्या
मारुती, हुंडाई, टाटा मोटर्स, होंडा, महिंद्रा, टोयोटा या आघाडीच्या सहा कार उत्पादक कंपन्यानी डिसेंबर महिन्यात एकुण 2,44,006 वाहने विकली. 2019 मध्ये या सहा कंपन्यांनी एकुण 2,04,169 एवढे यूनीट विकले होते. म्हणजे जवळपास 40 हजार वाहनांना खप अधिक झाला आहे.
'कॉम्पॅक्ट कार'ला जादा मागणी
देशात कार उत्पादनात अग्रेसर असलेली मारुतीच्या कॉम्पॅक्ट सेगमेंटधील कार सर्वात जास्त खपल्या. वॅगन आर, स्विफ्ट, सेलारीओ, इग्नीस,बलेनो आणि डिजायर या कारच्या मागणीत 18.2 टक्क्याने वाढ नोंदवली गेली, कंपनीच्या एकुण कार विक्रीमध्ये या सेगमेंटमधील कारचा वाटा 55 टक्क्यावर पोहोचला आहे. तर आल्टो, एस प्रेसो या मिनी कारच्या मागणीतही 4.4 टक्के वाढ नोंदवली गेली आहे.
महत्त्वाची बातमी : नववर्षाच्या पहिल्याच दिवशी बॉलिवुडमधील ड्रग्ज वितरणाप्रकरणी NCB ची जोरदार कारवाई
भविष्याचे आव्हान कायम
सण, उत्सवांमुळे कार खरेदीला जोर आला होता. मात्र नव्या वर्षात कोरोना लसीची उपलब्धता आणि अर्थव्यवस्थेचे पुर्नजिवन कसे होते त्यावर वाहन क्षेत्राचे भविष्य अवलंबून असेल असं या क्षेत्राली जाणकारांचे म्हणणे आहे. दूसरिकडे लॉकडाऊनमुळे अनेक कंपन्यांनी आपल्या उत्पादन क्षमता घटवली होती. मात्र अजूनही जगभरातील सप्लाय चेन (पुरवठा साखऴी) पुर्णपणे जाग्यावर आलेली नाही. त्यामुळे कार उत्पादनासाठी आवश्यक असलेले काही सुटे भाग, इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे , विषेशता मायक्रो प्रोसेसरचा पुरवठा अजूनही बरोबर झाला नाही. त्यामुळे वाहनांची मागणी वाढली तरी त्यातुलनेत उत्पादन करणे शक्य होत नाही असेही कार उत्पादकांचे म्हणणे आहे.
कार विक्रीची आकडेवारी
( संपादन - सुमित बागुल )
car sale pickup momentum after bad patch of corona lockdown