व्हिडिओकॉनच्या अध्यक्षांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल 

पीटीआय
Tuesday, 23 June 2020

स्टेट बॅंकसह इतर तीन बॅंकांची कोट्यवधी डॉलरची फसवणूक केल्याप्रकरणी व्हिडिओकॉन समूहाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक वेणुगोपाळ धूत यांच्याविरोधात सीबीआयने मंगळवारी गुन्हा दाखल केला आहे. 

नवी दिल्ली -  स्टेट बॅंकसह इतर तीन बॅंकांची कोट्यवधी डॉलरची फसवणूक केल्याप्रकरणी व्हिडिओकॉन समूहाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक वेणुगोपाळ धूत यांच्याविरोधात सीबीआयने मंगळवारी गुन्हा दाखल केला आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप   

आफ्रिकेतील ओझांबिकमधील तेल आणि वायू प्रकल्प खरेदीसाठी स्टेट बॅंक, आयसीआयसीआय बॅंक, आयडीबीआय बॅंकेकडून कर्ज घेतले होते. मात्र या कर्जाची फेड त्यांना करता आली नाही. त्यामुळे या बॅंकांनी हा प्रकल्प आपल्या ताब्यात घेतला आहे. या प्रक्रियेत स्टेट बॅंक, आयसीआयसीआय बॅंक, आयडीबीआय बॅंक यांचे कोट्यावधींचे नुकसान झाले आहे. यापूर्वी आयसीआयसीआय बॅंकेकडून धूत यांनी 1 हजार 875 कोटींचे घेतलेले कर्ज थकीत आहेत. त्याचीही चौकशी अद्याप सुरू आहे. त्यातच आता नवीन गैरव्यवहार उघडकीस आला आहे. त्यामुळे आर्थिक अनियमितता आणि गैरव्यवहार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: CBI has filed a case against Videocon CMD Venugopal Dhoot