ग्राहकाला आधारसक्ती केल्यास 1 कोटींचा दंड आणि तुरुंगवास

वृत्तसंस्था
बुधवार, 19 डिसेंबर 2018

नवी दिल्ली: दूरसंचार कंपन्यांकडून मोबाइल फोन क्रमांक किंवा बँकांमध्ये खाते उघडतेवेळी ग्राहकाकडे आधारसक्ती झाल्यास संबंधित दूरसंचार कंपनी किंवा बँकेला एक कोटी रुपयांचा दंड केला जाणार आहे. आता फोन क्रमांक आणि बँक खाते यांच्याशी आता आधार कार्ड क्रमांकाची जोडणी अनिवार्य नसेल असा महत्त्वाचा निर्णय नुकताच  काही दिवसांपूर्वी घेण्यात आला होता. 

ग्राहकाकडे आधारसक्ती झाल्यास संबंधित दूरसंचार कंपनी किंवा बँकेला मोठा दंड करण्यात आला आहेच. शिवाय आधार सक्ती करणाऱ्या कर्मचाऱ्याला देखील तीन ते दहा वर्षांची शिक्षा होण्याची तरतूद करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार, फक्त कल्याणकारी योजनांसाठीच आधार क्रमांक लिंक करणे गरजेचे असेल. मात्र इतर कोणत्याही क्षेत्रात ते अनिवार्य नसेल. त्यामुळे आधार क्रमांक द्यायचा किंवा नाही याचा निर्णय स्वतः ग्राहकाने घ्यायचा आहे. 

आता दूरसंचार कंपन्यांकडून मोबाइल फोन क्रमांक किंवा बँकांमध्ये खाते उघडतेवेळी आता आधार क्रमांकाव्यतिरिक्त इतर ओळखपत्र सादर करण्याची मुभा देण्यात आली आहे. मात्र ग्राहकाच्या आधारकार्डमार्फत माहिती चोरी झाली तरी देखील 50 लाख रुपयांच्या दंडाची तरतूद करण्यात आली आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Centre moves to make Aadhaar voluntary for banking, phones