नायलॉन उत्पादने बनवणाऱ्या 'या' कंपनीबाबत शेअर बाजार तज्ज्ञांना विश्वास!

सेंच्युरी एन्का तुमच्यासाठी चांगला पर्याय असल्याचे ते सांगतात.
Century Enka
Century Enkaesakal
Summary

सेंच्युरी एन्का (Century Enka) तुमच्यासाठी चांगला पर्याय असल्याचे ते सांगतात.

Stock to Buy : शेअर बाजार तज्ज्ञ संदीप जैन यांनी तुमच्यासाठी एक उत्तम स्टॉक निवडला आहे. तुम्हीही शेअर बाजारात गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल. सेंच्युरी एन्का (Century Enka) तुमच्यासाठी चांगला पर्याय असल्याचे ते सांगतात. सेंच्युरी एन्का (Century Enka) ही Nylon Filament Yarn म्हणजेच नायलॉन फिलामेंट यार्नमधील बाजारपेठेतील लीडर आहे आणि तिचा बाजारातील हिस्सा 25 टक्के आहे. त्याचबरोबर नायलॉन धाग्याचे जम्बो बीम बनवण्यातही ही कंपनी अग्रेसर आहे.

Century Enka
गुंतवणूकदारांना दिलासा! शेअर बाजारात 300 अंकांची उसळी

सेंच्युरी एन्कामध्ये (Century Enka) गुंतवणूकीचा सल्ला

सेंच्युरी एन्का ही बीके बिर्ला ग्रुपची कंपनी आहे, जी 1965 पासून या व्यवसायात आहे. ही कंपनी नायलॉन फिलामेंट यार्न मधील मार्केट लीडर आहे आणि त्याचे यात 25 टक्के मार्केट शेअर आहे. त्याचबरोबर नायलॉन धाग्याचे जम्बो बीम बनवण्यातही ही कंपनी अग्रेसर आहे. बाजारातील मार्केट करेक्शननंतर त्याचे शेअर्स खाली घसरले आहेत. त्यामुळे आताच्या घडीला यात गुंतवणूक करणे फायद्याचे ठरेल असा विश्वास संदीप जैन यांना वाटत आहे.

सेन्चुरी एन्का (Century Enka)

- सीएमपी (CMP) - 424.95 रुपये

- टारगेट (Target) - 510 रुपये

Century Enka
संघवी मूव्हर्स 2022 मध्ये बनणार शेअर मार्केटचा राजा! तज्ज्ञांना विश्वास

कंपनीचे मूल्यांकन (Valuation)

सध्या अतिशय कमी किंमतीत सेन्चुरी एन्काचे शेअर्स उपलब्ध आहेत. त्याची बुक व्हॅल्यू 528 रुपये आहे तर शेअर फक्त 424 रुपये मिळत आहे. गेल्या तीन वर्षांत, कंपनीचा CAGR (compound annual growth rate) 13-14 टक्के आहे. त्यांच्यावर कोणतेही कर्ज नाही. त्याचबरोबर कंपनीने गुंतवणूकदारांना चांगला डिव्हिडेंडही दिला आहे.

पीएटीमध्ये (PAT) सतत वाढ

गेल्या वर्षी सप्टेंबर तिमाहीत, त्याचा पीएटी (Profit After tax) 15 कोटी होता, जो या तिमाहीत 41 कोटी झाला आहे. त्याच वेळी, टीटीएम (Trailing Twelve Months) आधारावर त्याचा PAT 165 कोटी आहे. FII आणि DII यांचाही कंपनीवर पूर्ण विश्वास आहे आणि दोघेही त्यांचे स्टेक वाढवत आहेत. सेंच्युरी एन्कामध्ये सध्या FII आणि DII 8-9 टक्क्यांच्या आसपास आहेत.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com