संघवी मूव्हर्स 2022 मध्ये बनणार शेअर मार्केटचा राजा! तज्ज्ञांना विश्वास

ओमिक्रॉनच्या धास्तीत गुंतवणूकदारांना काहीसा दिलासा
Sanghvi Movers
Sanghvi Moversesakal
Summary

2021 संपत आले आहे आणि नवीन वर्ष येतयं. त्यामुळेच, आपल्या पोर्टफोलिओचे मूल्यांकन करण्याची ही योग्य वेळ आहे. आता काही उत्तम स्टॉक्सची निवड केली पाहिजे, जे भविष्यात चांगला परतावा देऊ शकतात.

Superstar Stocks 2022: 2022 हे वर्ष अशा वेळी सुरू होत आहे, जेव्हा बाजारात मोठ्या प्रमाणात अस्थिरता आहे. ओमिक्रॉनमुळे (Omicron) बाजारात अनिश्चितता वाढली आहे. चलनवाढ आणि सेंट्रल बँकेच्या कडक आर्थिक धोरणामुळेही बाजारावर परिणाम होतो आहे. त्यामुळेच अशा वातावरणात गुंतवणूकदारांसाठी चांगल्या दर्जाचे शेअर्स (Shares) निवडणे हे एक मोठे आव्हान आहे. दुसरीकडे बाजारात अनेक मजबूत स्टॉक्स (Stocks)आहेत, ज्यांचे मुल्यांकन अतिशय आकर्षक आणि मजबूत फंडामेंटल्समुळे 2022 मध्ये ते चांगला परतावा देऊ शकतात. असाच एक स्टॉक संघवी मूव्हर्सचा (Sanghvi Movers) आहे. शेअर बाजार तज्ज्ञ अविनाश गोरक्षकर यांनी या स्टॉकचे 2022 चा सुपरस्टार असे वर्णन केले आहे आणि गुंतवणुकीचा सल्ला दिला आहे.

Sanghvi Movers
शेअर मार्केट : ‘ब्लॅक फ्रायडे’तून संधीचा शोध!

संघवी मुव्हर्सबाबत तज्ज्ञ काय सांगत आहेत ऐका...

संघवी मूव्हर्सची (Sanghvi Movers)1989 मध्ये स्थापन झाली. ही मुळात एक अशी कंपनी आहे, जिचा व्यवसाय अर्थव्यवस्था (Economy) केंद्रित असल्याचे शेअर बाजार अविनाश गोरक्षकर म्हणाले. जेव्हा देशाची अर्थव्यवस्था सुधारते तेव्हा GDP वाढीचे आकडे चांगले असतात. कॉर्पोरेट कॅपेक्स अधिक आणि सरकार पायाभूत सुविधांवर खर्च वाढवते. त्या काळात अशा कंपन्यांचा व्यवसाय चांगला असतो. संघवी मूव्हर्सचे (Sanghvi Movers) सध्याचे मूल्यांकन आकर्षक असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. त्याचा ग्राहकवर्ग मजबूत आहे. हे सिमेंट क्षेत्रातील दालमिया भारत, अल्ट्राटेक सिमेंट सारख्या कंपन्यांना सेवा देते. त्याच वेळी, तेल आणि वायू क्षेत्रात बीपीसीएल आणि एचपीसीएल सारखे ग्राहक आहेत.

अविनाश गोरक्षकर यांनी संघवी मुव्हर्सच्या (Sanghvi Movers)शेअरमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. या स्टॉकमध्ये 1 वर्षासाठी 325 ते 330 रुपयांचे टारगेट दिले आहे. शेअरची सध्याची किंमत 200 रुपये आहे. या अर्थाने 65 टक्के परतावा मिळू शकतो असा विश्वास गोरक्षकर यांना आहे. हा शेअर गुंतवणूकदारांसाठी 1 वर्षात मल्टीबॅगर ठरत 100 टक्के परतावा दिला आहे. यावर्षी आतापर्यंत स्टॉकचा परतावा 80 टक्क्यांच्या जवळपास आहे.

Sanghvi Movers
शेअर मार्केट : शेअरची बास्केट!

कंपनीबाबत अधिक जाणून घेऊयात...

संघवी मूव्हर्स (Sanghvi Movers)ही क्रेन भाड्याने देणारी आघाडीची कंपनी आहे. या क्षेत्रात कंपनीचा 65 ते 70 टक्के बाजार हिस्सा आहे. कंपनी 1989 मध्ये स्थापन झाली आणि 1995 मध्ये बाजारात लिस्ट झाली. संघवी मूव्हर्समध्ये 400 पेक्षा जास्त मध्यम ते मोठ्या आकाराच्या हेवी ड्युटी हायड्रॉलिक टेलिस्कोपिक आणि काउलर क्रेन आहेत. त्यांची क्षमता 20 MT ते 1000 MT पर्यंत आहे.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com