चंदा कोचर यांची चौकशी सुरूच

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 5 मार्च 2019

मुंबई - आयसीआयसीआय बॅंकेच्या माजी व्यवस्थापकीय संचालिका व मुख्य कार्यकारी अधिकारी चंदा कोचर यांची आज सलग चौथ्या दिवशी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) चौकशी केली. हाती लागलेल्या पुराव्यांची पडताळणी करण्यासाठी ही चौकशी सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. 

चंदा कोचर यांची आज सकाळी ११.३० ते रात्री १०.३० पर्यंत चौकशी झाली. ईडीने प्रथम १ मार्चला त्यांची चौकशी केली होती. चंदा कोचर यांनी आपल्या पदाचा गैरवापर करत व्हिडिओकॉन कंपनीला ३२५० कोटींचे कर्ज मंजूर केले. हे कर्ज देताना त्यांनी व्यक्तिगत हित बघितले, असा आरोप आहे. 

व्हिडिओकॉनचे अध्यक्ष वेणुगोपाल धूत व कोचर यांचे पती दीपक कोचर यांनी एकत्र येऊन न्यूपॉवर रिन्यूएबल्स ही कंपनी स्थापन केली होती. या कंपनीच्या नावावर ६४ कोटी रुपयांचे कर्ज घेण्यात आले होते. त्याचप्रमाणे व्हिडिओकॉन समूहातील पाच कंपन्यांच्या नावावर तीन हजार २५० कोटी रुपयांचे कर्ज घेण्यात आले होते. त्यातील ८६ टक्के रक्कम म्हणजे दोन हजार ८१० कोटी रुपयांची परतफेड करण्यात आलेली नाही. त्यानंतर २०१७ मध्ये या कर्जाला बुडीत घोषित करण्यात आले होते. दीपक कोचर यांना व्हिडिओकॉनने मदत करावी, यासाठी कर्ज दिल्याच्या आरोपामुळे चंदा कोचर यांना आयसीआयसीआय बॅंकेच्या प्रमुखपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. 

Web Title: chanda kochhar inquiry