आरोग्य विम्यात झाला बदल, कोरोनाचाही हेल्थ कव्हर मिळणार

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 16 July 2020

IRDAI ने दिलेल्या आदेशावरून सर्व विमा कंपन्यांनी नुकतंच कोरोनाचा उपचार कव्हर करण्यासाठी कोरोना कवच स्पेशल पॉलिसी लाँच केली आहे. 

कोरोनाच्या संकटात जर कोणी आजारी पडलं तर त्यांच्यावर वेळेत उपचार होणं आणि विमा कंपन्यांकडून विम्याची रक्कम मिळणं हे कठीण होत आहे. संकटाच्या या काळात अनेक अशा घटना समोर येत आहेत ज्यामध्ये विम्याच्या योजनांबाबत रुग्णालयांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत नाही. यामुळेच आता IRDAI ने काही आदेश दिले आहेत. 

IRDAI ने दिलेल्या आदेशावरून सर्व विमा कंपन्यांनी नुकतंच कोरोनाचा उपचार कव्हर करण्यासाठी कोरोना कवच स्पेशल पॉलिसी लाँच केली आहे. यामुळे कोरोनाशी संबंधित रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या रुग्णाला पूर्ण कव्हर करे. यासाठी विम्याची रक्कम  50 हजार रुपयांपासून 5 लाख रुपयांपर्यंत आहे.

हे वाचा - आहारात मॅग्नेशिअमची गरज किती मोठ्या प्रमाणात असते ते सविस्तर वाचाच

शॉर्ट टर्म पॉलिसी
कोरोना कवच पॉलिसी शॉर्ट टर्मसाठी साडेतीन महिने, साडे सहा महिने आणि साडे नऊ महिन्यंसाठी करता येते. यामध्ये विमा रक्कम 50 हजार ते 5 लाख रुपयांपर्यंत मिळते. 50 हजार रुपयांच्या पटीत ही पॉलिसी आहे. कोरोना कवच पॉलिसी सर्व 30 जनरल आणि आरोग्य विमा कंपन्यांवर लागू आहे. 

कॅशलेस सुविधा
IRDAI ने 14 जुलैला जारी केल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं की, कोणतंही रुग्णालय कोरोनाच्या उपचारामध्ये कॅशलेस सुविधेला नकार देऊ शकणार नाही. याबाबत विमा कंपन्यांनासुद्धा आदेश देण्यात आले आहेत. त्यांनी रिड्रेसल मेकॅनिझम तयार करावं आणि कोरोना पीडितांची प्रकरणं प्राधान्याने पहावीत. 

हेही वाचा : जर तुमच्यात ‘व्हिटॅमिन सी’ची कमतरता असल्यास हे उपाय कराच

कोरोना वॉरिअर्सना डिस्काउंट
कोरोना वॉरिअर्सबाबत विमा कंपन्यांना खास सूचना देण्यात आल्या आहेत. कोरोनाशी लढा देणाऱ्या या वॉरिअर्सना डिस्काउंट ऑफर द्यावी असे आदेश दिले आहेत. यात डॉक्टर, नर्स, हेल्थ केअरमधील इतर लोकांना कोरोना कवच पॉलिसी घेतल्यास 5 टक्के स्पेशल डिस्काउंट मिळेल. 

लॉकडाऊनमुळे लिक्विडिटीची अडचण वाढली आहे. अशा परिस्थितीत विमा ग्राहकांना दिलासा देत IRDAI ने 20 एप्रिलला सर्व जनलर आणि आरोग्य विमा कंपन्यांना आदेश दिला होता की, आरोग्य विमा प्रिमियममध्ये इन्स्टॉलमेंटची सुविधा द्या. मार्च आणि एप्रिल महिन्यात आरोग्य विमा  रिन्यूअलसाठी कालावधी वाढवून देण्यात आला होता. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: changes in health insurance during corona pandemic