Rule Changes : उद्यापासून गॅस आणि विम्यांचे नियम बदलणार; वाचा सविस्तर

पुढच्या महिन्यात तुमच्या आर्थिक जीवनाशी संबंधित अनेक नियम बदलणार आहेत. याचा थेट परिणाम तुमच्या खिशावर आणि आयुष्यावरही पडणार आहे.
rule change
rule change sakal

आज ऑक्टोबर महिन्याचा शेवटचा दिवस आहे आणि उद्या नोव्हेंबर महिन्याचा पहिला दिवस असेल. पुढच्या महिन्यात तुमच्या आर्थिक जीवनाशी संबंधित अनेक नियम बदलणार आहेत. विमा पॉलिसी असो किंवा दर महिन्याला येणारे एलपीजी सिलिंडर असो. या सर्व सुविधा अधिक पारदर्शक आणि सुलभ करण्यासाठी अनेक बदल केले जात आहेत. याचा थेट परिणाम तुमच्या खिशावर आणि आयुष्यावरही पडणार आहे.

rule change
Car Loan : ‘या’ बँकांमध्ये आहे सर्वात स्वस्त कार लोन

LPG  सिलेंडरसाठी OTP  येणार

दर महिन्याच्या १ तारखेला तेल कंपन्या एलपीजीच्या किंमतींचा आढावा घेतात आणि आवश्यक असल्यास त्यात बदलही केले जातात. उद्या पुन्हा एकदा एलपीजीच्या किंमतींत बदल होण्याची शक्यता आहे. याशिवाय, आता तुम्हाला सिलेंडरच्या बुकिंगवर OTP मिळेल आणि हा OTP डिलिव्हरीच्या वेळी द्यावा लागेल. तरच तुम्हाला LPG सिलेंडर दिला जाईल.

सर्व विम्यासाठी KYC अनिवार्य

१ नोव्हेंबरपासून सर्व प्रकारच्या विमा पॉलिसींसाठी केवायसी अनिवार्य करण्यात येणार आहे. IRDA (Insurance Regulatory and Development Authority) च्या सूचनेनुसार, आता जीवन विमा पॉलिसी असो किंवा सामान्य विमा. सर्व पॉलिसी ग्राहकांना KYC करणे आवश्यक असेल. आतापर्यंत केवायसी केवळ आयुर्विमा पॉलिसींसाठी आवश्यक होते. आता आरोग्य आणि वाहन विम्यासाठीही केवायसी करावे लागणार आहे. आत्तापर्यंत केवळ १ लाख रुपयांच्या वरच्या पॉलिसींसाठी विमा कंपन्या त्यात केवायसी करत आहेत. आता KYC  करणे अनिवार्य करण्यात आले आहे.

rule change
UPI Payment: फोन पे आणि गुगल पे वर लागणार शुल्क? वाचा काय आहेत बँकांचे नियम

पीएम किसान योजनेचा नियमही बदलला

केंद्र सरकारच्या सर्वात यशस्वी योजनांपैकी एक असलेल्या पीएम किसान योजनेचे नियमही उद्यापासून बदलले जात आहेत. नवीन नियमानुसार, आता लाभार्थी केवळ त्याच्या आधार कार्डद्वारे पीएम किसान पोर्टलवर योजनेबद्दलची माहिती तपासू शकणार नाही. यासाठी आता त्यांना नोंदणीकृत मोबाईल क्रमांकही द्यावा लागणार आहे.

जीएसटी रिटर्नसाठी नवीन कोड

उद्यापासून देशातील लाखो व्यापाऱ्यांसाठी जीएसटीचे नियमही बदलणार आहेत. आता ५ कोटींपेक्षा कमी उलाढाल असलेल्या करदात्यांना विवरणपत्र भरताना चार अंकी HSN कोड देणे बंधनकारक असेल. पूर्वी हा कोड दोन अंकी होता. यापूर्वी 1 ऑगस्टपासून 5 कोटींपेक्षा जास्त उलाढाल असलेल्या करदात्यांना सहा अंकी कोड टाकणे बंधनकारक करण्यात आले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com