चीनी बॅंकासुद्धा अनिल अंबानींच्या थकबाकीच्या प्रतिक्षेत...

वृत्तसंस्था
बुधवार, 19 जून 2019

चीनमधील बॅंका अनिल अंबानींकडील थकबाकीच्या प्रतिक्षेत आहेत. यात चायना डेव्हलपमेंट बॅंक, इंडस्ट्रीयल अॅंड कमर्शियल बॅंक ऑफ चायना आणि एक्झिम बॅंक ऑफ चायना यांचा समावेश आहे. अनिल अंबानींच्या रिलायन्स कम्युनिकेशन्सकडे (आरकॉम) थकबाकी असलेल्या 14,774.75 कोटी रुपयांच्या प्रतिक्षेत या चीनी बॅंका आहेत. अनिल अंबानी समूहाच्या वेगवेगळ्या बॅंकांवर देशातील अनेक बॅंका आणि वित्तसंस्थांचे मोठेच कर्ज आहे. त्यात आता चीनी बॅंकांकडील थकबाकीचीसुद्धा भर पडली आहे. अनिल अंबानींच्या रिलायन्स कम्युनिकेशन्सने चायना डेव्हलपमेंट बॅंकेकडून 9,863.89 कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते.

चीनमधील बॅंका अनिल अंबानींकडील थकबाकीच्या प्रतिक्षेत आहेत. यात चायना डेव्हलपमेंट बॅंक, इंडस्ट्रीयल अॅंड कमर्शियल बॅंक ऑफ चायना आणि एक्झिम बॅंक ऑफ चायना यांचा समावेश आहे. अनिल अंबानींच्या रिलायन्स कम्युनिकेशन्सकडे (आरकॉम) थकबाकी असलेल्या 14,774.75 कोटी रुपयांच्या प्रतिक्षेत या चीनी बॅंका आहेत. अनिल अंबानी समूहाच्या वेगवेगळ्या बॅंकांवर देशातील अनेक बॅंका आणि वित्तसंस्थांचे मोठेच कर्ज आहे. त्यात आता चीनी बॅंकांकडील थकबाकीचीसुद्धा भर पडली आहे. अनिल अंबानींच्या रिलायन्स कम्युनिकेशन्सने चायना डेव्हलपमेंट बॅंकेकडून 9,863.89 कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. आरकॉमची ही सर्वात मोठी धनको आहे. सर्वाधिक कर्ज आरकॉम याच बॅंकेकडून घेतले आहे. एक्झिम बॅंक ऑफ चायनाकडून आरकॉमने 3,356.44 कोटी रुपयांचे तर इंडस्ट्रीयल अॅंड कमर्शियल बॅंक ऑफ चायनाकडून 1,554.42 कोटी रुपयांचे कर्ज घेतले आहे.

रिलायन्स कम्युनिकेशन्सने सोमवारी आपल्या थकबाकीदारांची किंवा फायनान्शियल क्रेडिटर्सची यादी जाहीर केली. आरकॉमवर एकूण 57,382.50 कोटी रुपयांचे कर्ज आहे. भारतीय बॅंकामध्ये स्टेट बॅंक ऑफ इंडिया ही सर्वात मोठी कर्जदार वित्तसंस्था आहे. आरकॉमने स्टेट बॅंकेकडून 4,905.37 कोटी रुपयांचे कर्ज घेतले आहे. त्याखालोखाल एलआयसीकडून 4,758 कोटी रुपये आणि बॅंक ऑफ बडोदाकडून 2,707.67 कोटी रुपयांचे कर्ज घेतले आहे. याआधी यावर्षाच्या सुरूवातीला एरिकसन या कंपनीने आपल्या थकबाकीसंदर्भात अनिल अंबानी यांच्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यानंतर अनिल अंबानी यांनी आपले बंधू मुकेश अंबानी यांची मदत घेत 460 कोटी रुपयांची थकबाकी एरिकसनला देत आपली जेमतेम सुटका करून घेतली होती.

मार्च 2018 मध्ये अनिल अंबानींच्या रिलायन्स समूहावर एकूण 1.7 लाख कोटी रुपयांचे प्रचंड कर्ज होते. वेगवेगळ्या कंपन्यांवरील कर्जांची परतफेड करता करता अनिल अंबानी यांनी आपले सर्व साम्राज्यच गमावले आहे. 
त्यांच्या काही कंपन्यांवरील कर्जाचा डोंगर असा आहे,

रिलायन्स कॅपिटल - 46,400 कोटी रुपये
रिलायन्स कम्युनिकेशन्स - 57,382.50 कोटी रुपये
रिलायन्स होम फायनान्स - 13,120 कोटी रुपये
रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्टर - 23,144 कोटी रुपये
रिलायन्स नेव्हल अॅंड इंजिनियरिंग - 10,689 कोटी रुपये
रिलायन्स पॉवर - 31,697 कोटी रुपये


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Chinese Banks Demand $2.1 Billion From Embattled Anil Ambani's Firm