क्‍लायमेट टेक्‍नॉलॉजीसवर ‘सिम्फनी लिमिटेड’चा ताबा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 29 जून 2018

मुंबई - एअर कूलर्स निर्मितीतील आघाडीची कंपनी असलेल्या ‘सिम्फनी लिमिटेड’ने ऑस्ट्रेलियातील ‘क्‍लायमेट टेक्‍नॉलॉजीस’वर ताबा मिळविला आहे. नुकताच दोन्ही कंपन्यांमध्ये खरेदी करार झाला. ‘सिम्फनी’ क्‍लायमेट टेक्‍नॉलॉजीसचा ९५ टक्के हिस्सा खरेदी करणार असून, त्यासाठी २०१ ते २२१ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. ‘क्‍लायमेट टेक्‍नॉलॉजीस’कडून इव्हापोरेटेड एअर कुलर्स आणि गॅस हिटर्सची निर्मिती केली जाते. ‘बोनएअर’ आणि ‘सेलएअर’ हे दोन ब्रॅंड लोकप्रिय आहेत. ऑस्ट्रेलियातील सॅलिसबरी आणि अमेरिकेतील नेवाडा येथे कंपनीचे उत्पादन प्रकल्प आहेत.

मुंबई - एअर कूलर्स निर्मितीतील आघाडीची कंपनी असलेल्या ‘सिम्फनी लिमिटेड’ने ऑस्ट्रेलियातील ‘क्‍लायमेट टेक्‍नॉलॉजीस’वर ताबा मिळविला आहे. नुकताच दोन्ही कंपन्यांमध्ये खरेदी करार झाला. ‘सिम्फनी’ क्‍लायमेट टेक्‍नॉलॉजीसचा ९५ टक्के हिस्सा खरेदी करणार असून, त्यासाठी २०१ ते २२१ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. ‘क्‍लायमेट टेक्‍नॉलॉजीस’कडून इव्हापोरेटेड एअर कुलर्स आणि गॅस हिटर्सची निर्मिती केली जाते. ‘बोनएअर’ आणि ‘सेलएअर’ हे दोन ब्रॅंड लोकप्रिय आहेत. ऑस्ट्रेलियातील सॅलिसबरी आणि अमेरिकेतील नेवाडा येथे कंपनीचे उत्पादन प्रकल्प आहेत. यानिमित्ताने ‘सिम्फनी’साठी ऑस्ट्रेलिया आणि अमेरिकन बाजारपेठेत विस्ताराची संधी उपलब्ध होईल, असे सिम्फनीचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक अचल बकेरी यांनी सांगितले.

Web Title: climate technology symphony limited