हेल्थकेअर सेक्टरमधील स्टॉक मल्टीबॅगरच्या वाटेवर

जिथे एका दिवसात मजबूत नफा कमावता येतो
Stock
Stocksakal
Updated on
Summary

जिथे एका दिवसात मजबूत नफा कमावता येतो.

शेअर बाजार (Share Market) ही एक अशी जागा आहे, जिथे एका दिवसात मजबूत नफा कमावता येतो. तिमाही निकालांनंतर, ब्रोकरेज फर्मने अनेक कंपन्यांच्या शेअर्सवर आपले रेटींग अपडेट केले आहे. नुकताच हेल्थकेअर सेक्टरमधील अपोलो हॉस्पिटल्सने (Apollo Hospitals) त्यांचे तिमाही निकाल सादर केले. निकाल इतके जबरदस्त होते की ब्रोकरेज कंपन्यांनी रेटींग वाढवत खरेदीचे मत कायम ठेवले आहे.

Stock
कॅश मार्केटचे 2 बेस्ट शेअर्स, तज्ज्ञ काय सांगतायत पाहूया...

CLSA कडून आउटपरफॉर्म रेटिंग

ब्रोकरेज कंपनी CLSA ने अपोलो हॉस्पिटल्सच्या (Apollo Hospitals) स्टॉकवर आउटपरफॉर्म रेटिंग दिले आहे. टारगेट 5250 रुपये केले आहे. डिसेंबरच्या तिमाहीत कंपनीने मजबूत निकाल सादर केले आहेत. अपोलो हेल्थ कंपनीकडून फंड उभारणीचाही फायदा झाला आहे.

CITI कडून टारगेटमध्ये वाढ

ब्रोकरेज फर्म CITI ने अपोलो हॉस्पिटल्सच्या (Apollo Hospitals) स्टॉकवर आपले खरेदीचे मत कायम ठेवले आहे आणि टारगेट 5800 रुपये ठेवले आहे.

Stock
5 वर्षात दिला 500 टक्क्यांपेक्षा जास्त रिटर्न, तुमच्याकडे आहे का 'हे' शेअर्स?

जेफरीजसह (Jefferies) इतरांचे काय म्हणणे आहे ?

जेफरीजने (Jefferies) अपोलो हॉस्पिटल्सवर आपले खरेदीचे मत कायम ठेवले आहे. त्यांनी टारगेट 6006 रुपयांवरून 5495 रुपये करण्यात आले आहे. याशिवाय गोल्डमन सॅचने (Goldman Sachs) खरेदीचे मत दिले आहे आणि टारगेट 5070 रुपयांवरून 4970 रुपये केले आहे. तर मॉर्गन स्टॅनलीने ओव्हरवेटचे रेटिंग दिले आहे पण टारगेटमध्ये 5569 रुपये अर्थात कोणताही बदल केलेला नाही.

शेअर बाजार तज्ज्ञ काय सांगतायत ?

मार्केट तज्ज्ञ सिद्धार्थ खेमका यांनी अपोलो हॉस्पिटल्स स्टॉकवर येत्या एका वर्षासाठी 5,900 रुपयांचे टारगेट दिले आहे. अपोलो हॉस्पिटल्स (Apollo Hospitals) ही भारतातील आघाडीची हॉस्पिटल चेन आहे. त्यात 71 रुग्णालये आणि 10 हजारांहून अधिक बेड आहेत. याव्यतिरिक्त, एक 24X7 ऑनलाइन आणि ऑफलाइन फार्मसी चॅनेल आहे. सध्याच्या वातावरणावराचा विचार केल्यास हेल्थ सेक्टरमध्ये चांगली तेजी आहे.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com