मोठी बातमी! टेक होम सॅलरीमध्ये होणार घट? जाणून घ्या कारण 

सकाळ न्यूज नेटवर्क
Wednesday, 9 December 2020

पुढील वर्षी एप्रिल महिन्यापासून कर्मचाऱ्यांच्या इन हँड किंवा टेक होम सॅलरीच्या कंपोनेंट किंवा स्ट्रक्चरमध्ये बदल होण्याची शक्यता आहे.

नवी दिल्ली- पुढील वर्षी एप्रिल महिन्यापासून कर्मचाऱ्यांच्या इन हँड किंवा टेक होम सॅलरीच्या कंपोनेंट किंवा स्ट्रक्चरमध्ये बदल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुमच्या टेक होम सॅलरीमध्ये घट होण्याची शक्यता आहे. सरकारने नव्या नियमानुसार ड्राफ्ट नियमांची अधिसूचना जारी केली आहे. याअंतर्गत कंपन्यांना आपल्या सॅलरी पॅकेजेच्या स्ट्रक्चरमध्ये बदल करावा लागू शकतो. हे नवे नियम Code on Wages, 2019 अंतर्गत येतात, ते 2021 च्या एप्रिल महिन्यापासून लागू होऊ शकतात. 

नव्या नियमांनुसार allowance component म्हणजे सॅलरीसोबत मिळणारे भत्ते एकूण सॅलरीच्या 50 टक्यांपेक्षा अधिक असू शकत नाहीत. याचा अर्थ बेसिक सॅलरी, सॅलरी स्ट्रक्चरच्या 50 टक्के असेल. नव्या नियमांची अंमलबजावणी करण्यासाठी कंपन्यांना सॅलरीच्या बेसिक कंपोंनेंटला वाढवावे लागणार आहे. ज्यामुळे ग्रेच्युटी आणि कर्मचाऱ्यांकडून भरले जाणाऱ्या प्रोविडेंट फंडची रक्कम वाढवली जाईल. 

सर्वोच्च न्यायालयाकडून मराठा आरक्षणावरची स्थगिती हटवण्यास तुर्तास नकार

सेवानिवृत्तीसाठीचे योगदान कमी टेक होम सॅलरीमध्ये होणार आहे, पण कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्ती कॉर्पसमध्ये वाढ होईल. सध्या अनेक प्रायवेट कंपन्या non-allowance चा भाग 50 टक्क्यांपेक्षा कमी ठेवतात आणि allowance चा भाग जास्त ठेवतात. नवीन नियमांची अंमलबजावणी झाल्यास हे सर्व बदलणार आहे. या नव्या नियमामुळे प्रायवेट सेक्टरमधील कर्मचाऱ्यांच्या सॅलेरीमध्ये बदल होण्याची शक्यता आहे, कारण ते जास्तीचा allowance मिळवत असतात. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Code on Wages take home Salary May Reduce From Next Year

Tags
टॉपिकस
Topic Tags: