कॉग्निझंट बनली दोन लाख कर्मचारी असणारी दुसरी आयटी कंपनी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 18 सप्टेंबर 2019

आघाडीची भारतीय आयटी कंपनी असलेल्या कॉग्निझंटने नवा मैलाचा दगड गाठला आहे. कॉग्निझंट आता 2 लाख कर्मचारी असणारी देशातील दुसरी आयटी कंपनी बनली आहे.

मुंबई : आघाडीची भारतीय आयटी कंपनी असलेल्या कॉग्निझंटने नवा मैलाचा दगड गाठला आहे. कॉग्निझंट आता 2 लाख कर्मचारी असणारी देशातील दुसरी आयटी कंपनी बनली आहे.

कॉग्निझंटचे जगभरात एकूण 2.9 लाख कर्मचारी आहेत. तर टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस) ही भारताची सर्वाधिक कर्मचारी असणारी आयटी कंपनी आहे. टीसीएसचे जगभरात एकूण 4 लाखांपेक्षा जास्त कर्मचारी आहेत. त्यातील बहुतांशी भारतीय आहेत. इन्फोसिसचे जगभरात 2.3 लाख कर्मचारी आहेत. मात्र, त्यातील 40,000 पेक्षा जास्त भारताबाहेर आहेत.

रामदास आठवले 'ग्रेटेस्ट लिडर्स' पुरस्काराने सन्मानित

कॉग्निझंटचे मुख्यालय अमेरिकेत आहे. त्यामुळे ती देशातील सर्वाधिक कर्मचारी असणारी एमएनसी कंपनी बनली आहे. इतर एमएनसी आयटी कंपन्यांमध्ये अॅक्सेंचरकडे 1.7 लाख कर्मचारी, आयबीएमकडे 1.2 लाख कर्मचारी आणि केपजेमिनीकडे 1.08 लाख कर्मचारी आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Cognizant becomes Second IT company with over two lakh employees