'कॉग्निझंट' करणार कर्मचारी कपात

वृत्तसंस्था
शुक्रवार, 3 ऑगस्ट 2018

कॉग्निझंट या आयटी क्षेत्रातल्या अमेरिकी मल्टीनॅशनल कंपनी वरिष्ठ कर्मचाऱ्यांच्या संख्येत कपात करणार आहे. वरिष्ठांना दिल्या जाणाऱ्या वेतनातून 3.5 कोटी डॉलर वाचवण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे. सरत्या तिमाहीत कॉग्निझंटने निकाल अपेक्षेप्रमाणे लागलेले नाहीत. कंपनीचे मुख्यालय न्यु जर्सी येथे आहे. कॉग्निझंटने 2017 साली 4,000 कर्मचाऱ्यांची कपात केली होती. त्याहीआधी कंपनीने 400 वरिष्ठ अधिकाऱ्यांना स्वेच्छा निवृत्ती घ्यायला लावली होती. 

कंपनीने वरच्या पदावरील जागा रिक्त करण्याचे धोरण स्विकारले असून ही स्वेच्छा निवृत्ती नसून वरिष्ठ पदे रिक्त करून कनिष्ठ कर्मचाऱ्यांना संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे, असे मत कॉग्निझंटचे अध्यक्ष राज मेहता यांनी व्यक्त केले आहे. मात्र नेमके किती वरिष्ठ पदे रिक्त होणार आहेत हे मेहता यांनी स्पष्ट केले नाही. कंपनीच्या जगभरातल्या कार्यालयामधून हे धोरण अवलंबले जाणार असून फक्त एखाद्या विभागापुरतेच ते मर्यादित नाही, असेही मेहता यांनी सांगितले. एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, कनिष्ठ पातळीवरील कमर्चाऱ्यांना जागा उपलब्ध करून देण्यासाठी हे धोरण अवलंबण्यात येणार आहे. 

चालू तिमाहीमध्ये कॉग्निझंटमधल्या कर्मचाऱ्यांच्या संख्येत 7,500 कर्माचाऱ्यांच्या संख्येत वाढ होऊन ती आता 2,68,900 वर पोचली आहे. कंपनीच्या कनिष्ठ कर्मचाऱ्यांची वेतनवाढ आणि पदोन्नती तिसऱ्या तिमाहीत दिली जाणार आहे. तर वरिष्ठ कर्मचाऱ्यांना वेतनवाढ आणि पदोन्नती चौथ्या तिमाहीत दिली जाणार असल्याची माहीती कंपनीचे मुख्य आर्थिक अधिकारी केरन मॅकलाफलीन यांनी दिली आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Cognizant to trim senior level executives to make space for juniors to grow

टॅग्स