कोट्यधीश व्हायचंय?  मग हा व्हिडिओ बघाच 

कोट्यधीश व्हायचंय?  मग हा व्हिडिओ बघाच 

प्रत्येकाला कोट्यधीश व्हायला नक्कीच आवडेल. मात्र कोट्यधीश होण्यासाठी दीर्घकालीन गुंतवणुकीची शिस्त लावणे आवश्यक आहे. दीर्घकालीन गुंतवणुकीचा कालावधी हा गणिताचा खेळ आहे. त्यामुळे अशी गुंतवणूक करताना प्रत्येकाने दोन नियम कायम लक्षात ठेवणे गरजेचे आहे. 

सर्वप्रथम गुंतवणुकीवरील परताव्याचे गणित समजून घेऊ

१ ) सरळ पद्धतीने परतावा = फक्त मुद्दल रकमेवर परतावा. 
२ ) चक्रवाढ पद्धतीने परतावा (Compounded Interest)  ( Compounded Annual Growth Rate   CAGR) =  मुद्दल + परतावा रकमेवर परतावा .

गुंतवणूक करताना पुढील दोन नियम लक्षात ठेवणे आवश्यक आहेत. 
गुंतवणुकीचा पहिला नियम: आपल्या वयानुसार 'इक्विटी'मध्ये किती गुंतवणूक करावी हे नियमाच्या माध्यमातून बघता येते. जसजसे वय वाढेल तसतशी 'इक्विटी'मधील गुंतवणूक कमी करणे गरजेचे आहे. कारण 'इक्विटी'मधील गुंतवणुकीवर अधिक जोखीम असते. 

म्युच्युअल फंडातील चक्रवाढीची ताकद समजून घ्या..याबाबत सांगत आहेत... तज्ज्ञ: डॉ. वीरेंद्र ताटके

"शंभर वजा वय" नियम ('इक्विटी'मध्ये किती गुंतवणूक करावी?)
1 ) वय वर्षे 20 असलेला गुंतवूणकर 
शंभर वजा (वजा ) 20 = 80
एकूण गुंतवणुकीच्या 80 टक्के गुंतवणूक 'इक्विटी'मध्ये करावी 

२) वय वर्षे 60  असलेला गुंतवणूकदार 
शंभर वजा (वजा ) 60  = 40
एकूण गुंतवणुकीच्या 40 टक्के  गुंतवणूक 'इक्विटी'मध्ये करावी. 

गुंतवणुकीचा दुसरा नियम: आपण केलेली गुंतवणूक किती वर्षात दामदुप्पट होईल हे जाणून घेण्यासाठी दुसरा नियम बघू या. 
72 चा नियम ( Rule of 72)
72 ÷ परतावा दर = दामदुप्पट होण्यासाठी आवश्यक वर्षे

उदाहरणार्थ: परताव्याचा दर  8 टक्के असेल तर दामदुप्पट होण्यासाठी 72 ÷ 8 म्हणजेच 9 वर्षे आवश्यक आहेत . 
जर परताव्याचा दर 12 टक्के  असेल तर 72 ÷ 12 म्हणजेच 6 वर्षे आवश्यक आहेत .

म्युच्युअल फंडात चक्रवाढीची ताकद 
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याकडं सर्वसामान्य नागरिकांचा कल मोठ्या प्रमाणात वाढला आहे. क्रिकेटमध्ये तुम्ही जर पीचवर जास्त काळ टिकून राहिलात, तर जास्त धावा निघू शकतात. त्याचप्रमाने म्युच्युअल फंडात दीर्घकाळ गुंतवणूक ठेवली, तर भाववाढीवर मात करणारा चांगला परतावा तुम्हाला मिळू शकतो. 'चक्रवाढीची ताकद' हे जगातील आठवे आश्‍चर्य मानले जाते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com