कोरोनाचा अर्थव्यवस्थेवर परिणाम, रोजगार घटले; रिझर्व्ह बँकेचा वार्षिक अहवाल

सकाळ न्यूज नेटवर्क
Tuesday, 25 August 2020

आरबीआयने 2019-20 (जुलै-जून) चा वार्षिक आर्थिक अहवाल (RBI 2019-20 ANNUAL REPORT) जाहीर केला.

नवी दिल्ली- आरबीआयने 2019-20 (जुलै-जून) चा वार्षिक आर्थिक अहवाल (RBI 2019-20 ANNUAL REPORT) जाहीर केला. यामध्ये कोविड -19  संकटामुळे देशातील आर्थिक व्यवहारावर परिणाम झाला असल्याचे दिसले आहे. त्यात उत्पादन व पुरवठा साखळीवर परिणाम होऊन  ती मंदावली आहे. याकाळात मोठ्या प्रमाणात बेरोजगारी (unemployment) आली आहे. रोजगार निर्मिती कमी झाली आहे. कोरोनाकाळात संथ गुंतवणूकीमुळे कोविड काळात अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम झाला आहे.

प्रशांत भूषण माफी न मागण्यावर ठाम; सर्वोच्च न्यायालयाने निर्णय ठेवला राखून

 गुंतवणूक वाढवून आर्थिक सुधारणांवर भर असेल-

आरबीआयचा 2019-20 चा वार्षिक अहवाल वाढती गुंतवणूक आणि सुधारणांवर केंद्रित आहे. अहवालात आरबीआयने म्हटले आहे की, दुस-या तिमाहीतही आर्थिक व्यवहारांमध्ये कोरोनाचा परिणाम दिसून येईल. कोरोनामुळे उत्पादन आणि पुरवठा साखळीत असमतोल निर्माण झाला आहे. आरबीआयने गुंतवणूकीसाठी सुधारणांची शिफारस केली आहे.  या अहवालात आरबीआयने 2040 पर्यंत इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये 4 ट्रिलियन डॉलर्सची गुंतवणूक करण्याची गरज असल्याचे सांगितली आहे.

या अहवालात असे म्हटले गेले आहे की 2019-20 मध्ये एकूण निव्वळ उत्पन्न 1.50 लाख कोटी रुपये होते.  मागील वर्षात याच कालावधीत एकूण निव्वळ उत्पन्न 1.95 लाख कोटी रुपये होते, जे आता 1.50 लाख कोटींवर गेले आहे. आरबीआयकडे 30 जूनपर्यंत एकूण ठेव 11.76 लाख कोटी होती. 

अकोल्यातील तब्बल ५०० वर्ष पुरातण गोसावी गणेश मंदिर
 

तसेच 2019-20 या आर्थिक वर्षात 2000 हजारांच्या नोटा छापल्या गेल्या नाहीत. त्याचबरोबर या आर्थिक वर्षात 2000 च्या नोटा कमी प्रमाणात चलनात दिसून आल्या होत्या. रिझव्‍‌र्ह बँक आता ओपन मार्केट ऑपरेशन (ओएमओ) अंतर्गत एकूण २०,००० कोटी रुपयांच्या सरकारी सिक्युरिटीजची एकाच वेळी खरेदी व विक्री करणार आहे. हे लिलाव प्रत्येकी १०,००० कोटींच्या दोन भागात करण्यात येणार असल्याचे आरबीआयने सांगितले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona's impact on the economy employment declined Annual Report of the Reserve Bank