श्रीमंतांना महागाईचा सर्वाधिक फटका, जाणून घ्या कारण! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

money

श्रीमंतांना महागाईचा सर्वाधिक फटका, जाणून घ्या कारण!

sakal_logo
By
ओमकार वाबळे

देशातील महागाईने मागील दहा वर्षांमध्ये उच्चांक गाठला आहे. वाढलेल्या इंधन दरांपासून ते जीवनावश्यक वस्तूंचे दरही गगनाला भिडले आहेत. यामुळे सामान्य नागरिकांना तर फटका बसलाच आहे. पण नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या एका अहवालानुसार महागाईचा सर्वाधिक फटका श्रीमंतांना बसल्याचं समोर आलंय.

देशातील महागाईबाबत क्रिसाईल या रेटिंग एजन्सीने दावा केला आहे की, महागाईचा सर्वाधिक फटका श्रीमंतांना बसलाय. कारण या एजन्सीच्या आकडेवारीनुसार जगातील सर्वाधिक 20 टक्के श्रीमंत लोकसंख्येतील व्यक्तींना सर्वाधिक गरीब असणाऱ्या 20 टक्के लोकसंख्येपेक्षा जास्त फटका बसला आहे.

या रेटिंग एजन्सीनुसार गरीब लोकसंख्येपैकी 20 टक्के लोक अन्नपदार्थांवर जास्त खर्च करतात. येत्या ऑक्टोबर महिन्यात हा आकडा कमी झालाय. तर दुसरीकडे लोकसंख्येच्या सगळ्यात जास्त श्रीमंतांपैकी 20 टक्के लोक खाण्याच्या गोष्टींव्यतिरिक्त वस्तूंवर अधिक खर्च करतात, जे आता आणखी महाग झालंय. CRISIL ने राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाचा डेटा वापरून तीन उत्पन्न गटांमध्ये सरासरी खर्च पद्धतीचा अंदाज लावला आहे. यामध्ये 20 टक्के गरीब, 60 टक्के मध्यमवर्गीय आणि 20 टक्के उच्च उत्पन्न गटातील लोकांचा समावेश होता. यानंतर, रेटिंग एजन्सीने हे सध्याच्या चलनवाढीच्या ट्रेंडसह मॅप केलं. जेणेकरून महागाईचा कोणता वर्ग प्रभावित झाला आहे, हे स्पष्ट झालं.

उल्लेखनीय गोष्ट म्हणजे फक्त ऑक्टोबर महिन्यात किरकोळ महागाई 4.48 टक्क्यांवर पोहोचली. यापूर्वी सप्टेंबरमध्ये किरकोळ चलनवाढीचा दर ४.३५ टक्के होता. राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने ही माहिती देताना अन्नधान्याची महागाई ऑक्टोबरमध्ये 0.85 टक्‍क्‍यांहून कमी होऊन 0.68 टक्‍क्‍यांवर पोहोचल्याचं म्हटलंय.

महागाईचा विचार केला तर, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 2026 पर्यंत महागाई दर 4 टक्क्यांपर्यंत ठेवण्याचं निश्चित केलंय. यामध्ये दोन टक्के कमी आणि जास्त जागा देण्यात आल्या आहेत. सलग चौथ्या महिन्यात सीपीआय आरबीआयच्या 6 टक्क्यांपर्यंत जाणाऱ्या मार्जिनच्या खाली आहे.

loading image
go to top