Crypto Exchange कंपनी उघडली अन् पाच वर्षात झाला अंबानींपेक्षा श्रीमंत | Changpeng Zhao | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Binance CEO Changpeng Zhao
Crypto Exchange कंपनी उघडली अन् पाच वर्षात झाला अंबाननींपेक्षा श्रीमंत

Crypto Exchange कंपनी उघडली अन् पाच वर्षात झाला अंबानींपेक्षा श्रीमंत

लोक सध्या Cryptocurrency मधून भरपूर कमाई करत आहेत. क्रिप्टोमध्ये गुंतवणूक करणारे अनेकजण श्रीमंत झाले आहेत, तर दुसरीकडे काही लोक गरीबही झाले आहेत. तुमचा क्रिप्टोवर विश्वास असेल किंवा नसेलही, मात्र तुम्ही त्याकडे दुर्लक्ष करू शकत नाही. ही बातमी वाचल्यानंतर कदाचित तुम्हालाही क्रिप्टोबद्दल विचार करायला भाग पडाल.

फास्ट फूड चेन मॅकडोनाल्डचे माजी कर्मचारी असलेल्या चांगपेंग झाओ यांनी 2017 मध्ये बिनन्स नावाचे क्रिप्टोकरन्सी एक्सचेंज सुरू केले. चांगपेंग झाओ हे क्रिप्टो स्पेसमध्ये सीझेड नावाने प्रसिद्ध आहे. ब्लूमबर्गच्या ताज्या अंदाजानुसार, चांगपेंग झाओ (Binance CEO Changpeng Zhao) यांची एकूण संपत्ती सध्या 96 अब्ज डॉलर्स आहे. रिपोर्टनुसार, आता चांगपेंग झाओने नेट कमाईच्या बाबतीत भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांनाही मागे टाकले आहे.

हेही वाचा: Gold Rate : सोन्याच्या दरात किंचित वाढ! किमतीत सातत्याने चढ-उतार

महत्त्वाचे म्हणजे, ब्लूमबर्ग बिलियनेअर इंडेक्सच्या 9 जानेवारीच्या यादीनुसार, मुकेश अंबानी यांची एकूण संपत्ती $92.9 अब्ज आहे, तर झाओची एकूण संपत्ती $96 बिलियनवर पोहोचली आहे. ब्लूमबर्गच्या अंदाजानुसार, चांगनेग झाओ मुकेश अंबानींच्या वर पोहोचला आहे. ब्लूमबर्गच्या या यादीत भारतातील दुसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती गौतम अदानी यांचाही समावेश आहे. अदानी यांची एकूण संपत्ती $78.6 अब्ज आहे.

हेही वाचा: Share Market | शेअर बाजारात किरकोळ नफा-वसुली!

उत्पन्नामध्ये होणारी ही आश्चर्यचकित करणाही आहे, कारण क्रिप्टो एक्सचेंज बायनान्स कंपनी 4.5 वर्षांपूर्वी म्हणजेच 2017 मध्ये सुरू झाली होती. तर या यादीतील इतर लोकांच्या कंपन्या अनेक दशकांपासून सुरू आहेत. तरी झाओची एकूण संपत्ती ब्लूमबर्गच्या अंदाजापेक्षा खूप जास्त असू शकते. कारण ब्लूमबर्गने झाओने बिटकॉइन आणि बिनन्स कॉईनमध्ये गुंतवलेले पैसे समाविष्ट केलेले नाहीत.

हेही वाचा: चिनी कर्जामुळे श्रीलंकेचं दिवाळं! जानेवारीमध्ये संपेल परकीय चलन साठा

झाओच्या वैयक्तिक क्रिप्टोकरन्सी होल्डिंग्सचाही हिशोब केला असता, तर त्याची एकूण संपत्ती बिल गेट्सइतकी असू शकते, असे सांगण्यात येत आहे. बिल गेट्स सध्या 134 अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह जगातील चौथ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती आहेत. ब्लूमबर्गच्या अहवालानुसार हा अंदाज झाओच्या बिनन्समधील स्टेकबाबत आहे. 2021 मध्ये Binance ने $20 अब्ज कमाई केल्याचे सांगितले जात आहे. झाओकडे या कंपनीचे ९०% शेअर्स आहेत.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Crypto currency
loading image
go to top