चिनी कर्जामुळे श्रीलंकेचं दिवाळं! जानेवारीमध्ये संपेल परकीय चलन साठा

चिनी कर्ज अन्‌ महागाईमुळे श्रीलंकेचं दिवाळं! जानेवारीमध्ये संपेल परकीय चलन साठा
चिनी कर्जामुळे श्रीलंकेचं दिवाळं! जानेवारीमध्ये संपेल परकीय चलन साठा
चिनी कर्जामुळे श्रीलंकेचं दिवाळं! जानेवारीमध्ये संपेल परकीय चलन साठाSakal
Summary

श्रीलंका गंभीर आर्थिक संकटाचा सामना करत आहे, ज्यामुळे 2022 मध्ये श्रीलंका हा देश दिवाळखोर होऊ शकतो.

एका मीडिया रिपोर्टनुसार, श्रीलंका (Sri Lanka) गंभीर आर्थिक संकटाचा सामना करत आहे, ज्यामुळे 2022 मध्ये श्रीलंका हा देश दिवाळखोर होऊ शकतो. महागाईनेही (Inflation) विक्रमी पातळी गाठली आहे. यापूर्वी, गेल्या वर्षी 30 ऑगस्ट रोजी श्रीलंका सरकारने (Sri Lankan Government) चलन मूल्यात तीव्र घसरण आणि त्यानंतर अन्नधान्याच्या किमतीत तीव्र वाढ झाल्यानंतर राष्ट्रीय आर्थिक आणीबाणी घोषित केली होती. चीनसह (China) अनेक देशांकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड करण्यात श्रीलंकेला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. (Sri Lanka is facing a financial crisis due to borrowing from China and inflation)

जीडीपीच्या 42.6 टक्के इतके कर्ज

कोलंबो गॅझेटमध्ये (Colombo Gazette) लिहिताना सुहेल गुप्टिल (Suhail Guptill) म्हणाले की, श्रीलंकेला गेल्या दशकभरापासून सातत्याने दुहेरी तूट (वित्तीय तूट आणि व्यापार तूट) सामोरे जावे लागत आहे. 2014 पासून श्रीलंकेचे बाह्य कर्ज सातत्याने वाढत आहे आणि 2019 मध्ये GDP च्या 42.6 टक्‍क्‍यांपर्यंत पोहोचले आहे. गुप्टिल म्हणाले की, 2019 मध्ये देशाचे एकूण बाह्य कर्ज US$ 33 अब्ज होते. त्यानंतर, स्टॅंडर्ड अँड पुअर्स, मूडीज आणि फिचसह अनेक क्रेडिट रेटिंग (Credit Rating) एजन्सींनी श्रीलंकेचे क्रेडिट रेटिंग C वरून B वर आणले. यामुळे आंतरराष्ट्रीय सॉवरेन बॉंड्‌स (International Sovereign Bonds - ISBs) द्वारे निधी मिळवणे कठीण होते.

चिनी कर्जामुळे श्रीलंकेचं दिवाळं! जानेवारीमध्ये संपेल परकीय चलन साठा
IIT तज्ज्ञ म्हणतात, 'या' कालावधीपर्यंत संपेल कोरोनाची तिसरी लाट!

कर्जामुळे अडचणीत श्रीलंका

अहवालात पुढे म्हटले आहे की, कर्ज ही श्रीलंकेसाठी सर्वात गंभीर समस्या आहे, विशेषत: चीनकडून कर्जाचा बोजा. श्रीलंकेवर US$5 बिलियन पेक्षा जास्त कर्ज आहे आणि गेल्या वर्षी बीजिंगकडून त्याच्या गंभीर आर्थिक संकटाचा सामना करण्यासाठी US$1 बिलियन अतिरिक्त घेतले, जे हप्त्यांमध्ये दिले जात आहे.

जानेवारी 2022 पर्यंत संपेल देशाचा परकीय चलन साठा

असा अंदाज आहे की, देशाचा परकीय चलन साठा जानेवारी 2022 पर्यंत पूर्णपणे संपेल आणि आवश्‍यक पेमेंटसाठी किमान US$437 दशलक्ष कर्ज घ्यावे लागेल. या अहवालात म्हटले आहे की, फेब्रुवारी-ऑक्‍टोबर 2022 या कालावधीत USD 4.8 अब्ज डॉलरची विदेशी कर्ज सेवा कशी व्यवस्थापित करायची ही देशासमोरील मोठी समस्या आहे. नोव्हेंबरमध्ये महागाईने 11.1 टक्‍क्‍यांचा विक्रमी उच्चांक गाठला आणि वाढत्या किमतींमुळे अनेकांना मूलभूत वस्तू उपलब्ध होत नाहीत.

अतिशय कमी वाढीचा दर

श्रीलंकेतील आर्थिक संकट हे प्रामुख्याने कमी विकास दरामुळे आहे. विकासदर सध्या 4 टक्‍क्‍यांवर आहे आणि कर्जाच्या परतफेडीच्या मोठ्या जबाबदाऱ्यांमुळे परिस्थिती बिकट होत आहे. नोव्हेंबर 2021 पर्यंत उपलब्ध परकीय चलनाचा साठा फक्त USD 1.6 अब्ज होता, तर पुढील 12 महिन्यांत, श्रीलंकेचे सरकारी आणि खाजगी क्षेत्र अंदाजे US$ 7.3 अब्ज देशी आणि विदेशी कर्जाच्या रूपात परतफेड करणार आहे. यात जानेवारी 2022 मध्ये आंतरराष्ट्रीय सॉवरेन रोख्यांमध्ये US$500 दशलक्ष पेमेंटचा समावेश आहे, असे अहवालात म्हटले आहे.

जीवनावश्‍यक साहित्य विक्रीची जबाबदारी लष्कराकडे

राजपक्षे यांच्याकडून श्रीलंकेत आर्थिक आणीबाणी घोषित केल्यानंतर, तांदूळ (Rice) आणि साखरेसह (Sugar) जीवनावश्‍यक वस्तू निर्धारित सरकारी किमतीत विकल्या जातील याची खात्री करण्याचे अधिकार लष्कराला देण्यात आले. परंतु यामुळे लोकांच्या समस्या सुटल्या नाहीत. केंद्रीय बॅंकेचे माजी डेप्युटी गव्हर्नर, डब्ल्यूए विजेवर्धने (WA Wijewardene) यांनी इशारा दिला आहे की, सामान्य लोकांच्या संघर्षामुळे आर्थिक संकटात भर पडेल. गुप्टिल (Guptill) यांनी म्हटले आहे की, जागतिक बॅंकेचा (World Bank) अंदाज आहे की Covid-19 महामारी सुरू झाल्यापासून पाच लाख लोक दारिद्य्ररेषेखाली गेले आहेत.

चिनी कर्जामुळे श्रीलंकेचं दिवाळं! जानेवारीमध्ये संपेल परकीय चलन साठा
मित्राकडे मदत मागणे युवतीला पडले महागात! दोघांकडून सामूहिक अत्याचार

भारताकडून मदत

गुप्टिल पुढे म्हणाले की, तात्पुरती समस्या कमी करण्यासाठी आणि लोकप्रिय नसलेल्या धोरणांचे निराकरण करण्याच्या प्रयत्नात सरकारने तात्पुरत्या मदत उपायांचा अवलंब केला आहे. त्यात शेजारील भारतातून अन्न, औषधे आणि इंधन आयात करण्यासाठी क्रेडिट लाइन आणि भारत, चीन व बांगलादेशमधून चलन बदलणे आणि ओमानकडून पेट्रोलियम खरेदी करण्यासाठी कर्ज समाविष्ट आहे. चलन वाचवण्यासाठी श्रीलंका सरकारने इराणसोबतचे पूर्वीचे तेल कर्ज चहाने फेडण्याची योजना आखली आहे. श्रीलंका दरमहा 5 दशलक्ष अमेरिकन डॉलर्सचा चहा इराणला पाठवणार आहे. याव्यतिरिक्त, कोलंबोने सध्याच्या आर्थिक संकटामुळे आणि डॉलरच्या तुटवड्यामुळे खर्चात कपात करण्यासाठी डिसेंबर 2021 पासून तीन परदेशी राजनैतिक मिशन बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. तथापि, या उपायांमुळे केवळ अल्पकालीन दिलासा मिळेल आणि कर्ज उच्च व्याजदराने द्यावे लागेल, ज्यामुळे श्रीलंकेवरील कर्जाचा बोजा वाढेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com