"एचडीएफसी'कडून कर्जदरात कपात

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 1 ऑगस्ट 2019

गृहकर्ज व्यवसायातील "एचडीएफसी'ने सर्व प्रकारच्या कर्जांच्या व्याजदरात 0.10 टक्‍क्‍याची कपात केली आहे.

मुंबई: गृहकर्ज व्यवसायातील "एचडीएफसी'ने सर्व प्रकारच्या कर्जांच्या व्याजदरात 0.10 टक्‍क्‍याची कपात केली आहे. आजपासून (ता.1) नवे कर्जदर लागू होतील, असे कंपनीने म्हटले आहे. या कर्जदर कपातीचा विद्यमान कर्जदार आणि नव्या ग्राहकांना फायदा होणार असून मासिक हप्त्याचा भार काही प्रमाणात हलका होणार आहे. 30 लाखांपर्यंतच्या कर्जावर आता 8.60 टक्के व्याजदर राहील.

महिलांसाठी तो 8.55 टक्के आहे. 30 ते 75 लाखांपर्यंतच्या कर्जासाठी यापुढे 8.85 टक्‍के व्याजदर राहील, असे कंपनीने म्हटले आहे. 75 लाखांपुढील कर्जासाठी नवा व्याजदर 8.90 टक्के राहील. 1 ऑगस्टपासून नवे व्याजदर लागू होणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: cut rates from hdfc