डेन्मार्कमधील बँकेचे उणे व्याजदराने कर्ज 

वृत्तसंस्था
बुधवार, 14 ऑगस्ट 2019

जिस्क बॅंक ही डेन्मार्कमधील तिसऱ्या क्रमांकाची मोठी बँक आहे. बँकेने आता दहा वर्षांच्या मुदतीसाठी उणे 0.5 टक्के व्याजदराने गृहकर्ज देण्यास सुरवात केली आहे.

कोपेनहेगेन : डेन्मार्कमधील जिस्क बॅंक उणे व्याजदारने कर्ज देणारी जगातील पहिली बॅंक ठरली आहे. बॅंक गृहकर्जदारांना उणे 0.5 टक्के वार्षिक व्याजदराने कर्ज देणार आहे. 

उणे व्याजदर म्हणजे बॅंकेकडून घेतलेल्या कर्जापेक्षा कमी रक्कम कर्जदार बॅंकेला परत करेल. जिस्क बॅंक ही डेन्मार्कमधील तिसऱ्या क्रमांकाची मोठी बॅंक आहे. बॅंकेने आता दहा वर्षांच्या मुदतीसाठी उणे 0.5 टक्के व्याजदारने गृहकर्ज देण्यास सुरवात केली आहे. कर्जदार दरमहा हप्ता भरेल आणि त्याची उर्वरित रक्कम त्याने घेतलेल्या कर्जापेक्षा दरमहा कमी होत जाईल. यानंतर डेन्मार्कमधील आणखी एक मोठी बॅंक नॉर्डियाने 20 वर्षांच्या मुदतीसाठी शून्य टक्के दराने कर्ज देण्याची घोषणा केली आहे. दरम्यान, कर्जावरील व्याजदरात झालेल्या घसरणीचा परिणाम ठेवींच्या व्याजावरही होत आहे. ग्राहकांना ठेवीवर व्याज मिळणे शक्‍य होणार नाही. याचा फटका ठेवीदार ग्राहकांना बसणार आहे. 

कर्जदारांना आश्‍चर्याचा धक्का 
जिस्क बॅंकेने उणे व्याजदाराने कर्ज दिल्याचे जाहीर केल्यानंतर कर्जदारांना आश्‍चर्याचा धक्काच बसला. बॅंकेकडे अनेक कर्जदारांनी हे कसे शक्‍य असल्याबद्दची विचारणा केली. खरोखरच बॅंक असे कर्ज देणार आहे का, असे प्रश्‍नही अनेकांनी उपस्थित केले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Danish bank launches worlds first negative interest rate loan