स्मार्ट गुंतवणूक : डे ट्रेडिंग’ वि. ‘इन्व्हेस्टिंग’

स्मार्ट गुंतवणूक : डे ट्रेडिंग’ वि. ‘इन्व्हेस्टिंग’

‘सरलेल्या आर्थिक वर्षात (२०२०-२१) भारतीय शेअर बाजारात एक कोटींहून अधिक नवी खाती उघडली गेली. गुंतवणुकीच्या पहिल्याच वर्षात अनेक नवगुंतवणूकदारांना दामदुप्पट परतावा देखील मिळाला. परिणामी, शेअर बाजारात गुंतवणूक करण्याची आणि जोखीम घेण्याची क्षमता वाढत आहे.

शेअर बाजाराविषयी जागरूकता निर्माण होत असतानाच ‘ईझी मनी’ समजून होत असलेले ‘डे ट्रेडिंग’ मात्र धोक्याचे आहे!

डे ट्रेडिंग’चे मायाजाल

काही तासांमध्ये हजारो किंवा लाखो रुपये मिळविणे खूप आकर्षक वाटत असले तरी ते फसवे असते. कोरोना महासाथीच्या पार्श्वभूमीवर उत्पन्नाचे मार्ग बंद झाल्याने अनेकांनी शेअर बाजारातील ‘डे ट्रेडिंग’चा मार्ग स्वीकारला. आठवड्यातील दोन दिवस ‘प्रॉफिट’ आणि तीन दिवस ‘लॉस’ म्हणजे शेवटी नुकसानच, हे ठरलेले असते. मात्र, ते वेळीच लक्षात येत नसल्याने अनेक नवगुंतवणूकदार ‘डे ट्रेडिंग’च्या चक्रव्यूहात अडकले आहेत. हजारो-लाखो रुपयांची ‘रिस्क’ घेताना कमी कालावधीत पैसे कमविण्याची घाई आणि एखाद्या कंपनी किंवा शेअरविषयी सखोल अभ्यास न करता सोशल मीडिया किंवा टीव्हीवर मिळणाऱ्या ‘टिप्स’च्या माध्यमातून पैसे कमविण्याकडे कल असल्याने नुकसानीचा सामना करावा लागत आहे.

म्युच्युअल फंडाचा मार्ग सोयीचा

अगोदरच बिघडलेल्या आर्थिक गणितात आणखी भर नको असल्यास व्यवस्थित अभ्यास करून प्रत्यक्ष शेअरमध्ये केलेली गुंतवणूक चांगला परतावा देणारी आणि नुकसानविरहित ठरू शकते. मात्र, अभ्यास आणि माहितीचा अभाव आणि शेअर बाजारातील घडामोडींसाठी आवश्यक तो वेळ देऊ शकत नसल्याने अनेकांना हे शक्य होत नाही. अशावेळी म्युच्युअल फंड गुंतवणुकीचा सर्वोत्तम पर्याय ठरतो. शेअर बाजारात सुरु असलेल्या घडामोडींचे आकलन करून अभ्यासपूर्ण माहितीच्या आधारे गुंतवणूक करण्यासाठी म्युच्युअल फंड कंपन्या कार्यरत असतात. कंपनीविषयीची माहिती, भविष्यातील योजना, कंपनीचा आर्थिक ताळेबंद अशा अनेक घटकांचा अभ्यास करण्यासाठी संपूर्ण टीम काम करत असल्याने म्युच्युअल फंडातील गुंतवणूक फायद्याची ठरते.

स्मार्ट गुंतवणूक : डे ट्रेडिंग’ वि. ‘इन्व्हेस्टिंग’
ग्राहक आयोगात तीन तिघाड अन् कामात बिघाड!

‘रिस्क’ घ्या; पण ‘कॅल्क्युलेटेड’!

‘डे ट्रेडिंग’च्या दुष्टचक्रातून बाहेर पडणे अनेकांना मानसिकदृष्ट्या शक्य होत नाही. त्यातच तरुण पिढी म्हटले, की ‘रिस्क’ घेणे आलेच. अशावेळी तुम्ही ‘कॅल्क्युलेटेड रिस्क’ घ्यायला हवी. ‘डे ट्रेडिंग’ ऐवजी तुलनेने जोखीम कमी असलेल्या म्युच्युअल फंडाचा पर्याय निवडता येऊ शकतो. म्युच्युअल फंडात स्मॉल कॅप, मिड कॅप, लार्ज कॅप, हायब्रिड फंड असे अनेक पर्याय असतात. ‘डे ट्रेडिंग’ ऐवजी ‘इन्व्हेस्टिंग’चा मार्ग निवडणे हिताचे ठरते.

तुम्हाला देखील म्युच्युअल फंडातील विविध संधींचा लाभ घ्यायचा असेल, तर आजच ‘सकाळ मनी’च्या तज्ज्ञ गुंतवणूक सल्लागारांपर्यंत पोचण्यासाठी ७३५०८ ७३५०८ या क्रमांकावर मिस्ड कॉल द्या.

स्मार्ट गुंतवणूक : डे ट्रेडिंग’ वि. ‘इन्व्हेस्टिंग’
अल्पवयीन मुले, तरुणांमध्ये 'बदला फॅक्‍टर' ठरतोय जीवघेणा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com