डीबी रियल्टीच्या स्टॉकमध्ये दुसऱ्या दिवशीही पाच टक्क्यांची वाढ

कंपनीने एक्सचेंज फायलिंगद्वारे ही माहिती दिली होती.
Stock Market
Stock Market Sakal
Updated on
Summary

कंपनीने एक्सचेंज फायलिंगद्वारे ही माहिती दिली होती.

डीबी रियल्टी लिमिटेडच्या (DB Realty Ltd.) स्टॉक्सना गुरुवारी बीएसईवर पाच टक्क्यांचा अप्पर सर्किट लागला आहे. सध्या तो 122 रुपयांवर कायम आहे. कंपनीकडून निधी उभारणीच्या योजना जाहीर केल्यानंतर, या शेअर्सना (Shares) सलग दुसऱ्या दिवशी अपर सर्किट लागलं आहे.

डीबी रियल्टीच्या बोर्डाच्या बैठकीनंतर एक दिवसापूर्वी म्हणजेच बुधवारी या बैठकीत 5 कोटी कंवर्टीबल वॉरंट (convertible warrants) जारी करून निधी उभारण्यास मान्यता देण्यात आल्याचे सांगण्यात आले. डीबी रियल्टीच्या संचालक मंडळाचीही गेल्या आठवड्यात बैठक झाली. त्या बैठकीत 7,70,00,000 वॉरंट जारी करण्यास मान्यता देण्यात आली. कंपनीने एक्सचेंज फायलिंगद्वारे ही माहिती दिली होती.

Stock Market
दोन दिवसांत तब्बल 36 टक्क्यांनी वाढला स्टॉक

नॉन-प्रमोटर इनवेस्टर्सना वॉरंट जारी करणार

प्रमोटर नसलेल्या गुंतवणूकदारांना प्रिफरेंशियल आधारावर वॉरंट जारी करणार आहे. या गुंतवणूकदारांमध्ये राकेश झुनझुनवाला आणि त्यांची पत्नी रेखा झुनझुनवाला यांचाही समावेश आहे. हे 1,00,00,000 वॉरंट झुनझुनवाला यांच्या कंपनी RARE Investments मार्फत जारी केले जातील. इतर नॉन-प्रमोटर गुंतवणूकदारांमध्ये लोटस फॅमिली ट्रस्ट, KIFS डीलर्स आणि इतर अनेकांचा समावेश आहे.

प्रत्येक वॉरंट 1 इक्विटी शेअरमध्ये कंवर्टिबल आहे आणि अलॉटमेंट तारखेपासून 18 महिन्यांच्या आत कधीही एक किंवा अनेक हप्त्यांमध्ये रूपांतरित केले जाऊ शकते. डीबी रियल्टीचे शेअर्स गेल्या काही ट्रेडिंग सत्रांपासून तेजीत आहेत. प्रमोटर आणि गुंतवणूकदारांना वॉरंट जारी करून 563 कोटी रुपयांच्या योजनेच्या घोषणेसह, रिअल्टी फर्म अपर सर्किटमध्ये आहे.

Stock Market
Budget Picks : बजेटच्या एक दिवस आधी खरेदी करा हा केमिकल स्टॉक!

एका वर्षात शेअर्समध्ये 563 टक्क्यांनी वाढ

या स्टॉकमध्ये गेल्या एका महिन्यात 95 टक्क्यांनी वाढ झाली आहे, तर गेल्या सहा महिन्यांत 434 टक्क्यांची वाढ दिसली आहे. फेब्रुवारी 2021 मध्ये, याची किंमत सुमारे 18 रुपये प्रति शेअर होती, जी आतापर्यंत 563 टक्क्यांनी वाढली आहे. 2022 मध्ये आतापर्यंत त्यात 148 टक्क्यांची वाढ झाली आहे.

BSE च्या शेअरहोल्डिंग पॅटर्ननुसार, राकेश झुनझुनवाला यांच्याकडे डिसेंबर 2021 पर्यंत DB रियल्टीमध्ये 2.06 टक्के हिस्सा आहे.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com