दोन दिवसांत तब्बल 36 टक्क्यांनी वाढला स्टॉक

तुमच्याकडे आहे का हा शेअर?
share and stock market
share and stock marketSakal
Summary

या स्टॉकने 2021 मध्ये मल्टीबॅगर परतावा दिला आहे.

इशान डायस अँड केमिकल्सच्या (Ishan Dyes And Chemicals) शेअर्सने गेल्या दोन सत्रांमध्ये जवळपास 36 टक्क्यांची वाढ नोंदवली आहे. हा शेअर 121.50 रुपयांवरून 52 आठवड्यांच्या उच्चांकी 166 रुपयांवर पोहोचला आहे. या वाढीचे मुख्य कारण म्हणजे या केमिकल कंपनीतील प्रमुख गुंतवणूकदार शंकर शर्मा यांनी मंगळवारी मोठ्या प्रमाणात बल्क डीलद्वारे शेअर खरेदी केल्याने ही तेजी आल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

share and stock market
केवळ 39 रुपयांच्या मल्टीबॅगर स्टॉकने 7 वर्षात 1 लाखाचे केले 67 लाख

शंकर शर्मा यांची इशान डाईज अँड केमिकल्समध्ये भागीदारी

बीएसईच्या वेबसाइटवर उपलब्ध असलेल्या बल्क डील डेटानुसार, शंकर शर्मा यांनी कंपनीचे 7 लाख शेअर्स 121.71 रुपये प्रति शेअर या दराने खरेदी केले आहेत, याचा अर्थ आघाडीच्या गुंतवणूकदाराने कंपनीचे 7 लाख शेअर्स खरेदी करण्यासाठी 8.52 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे.

शेअरचा आउटलुक

शंकर शर्मा यांनी भागीदारी खरेदी केल्याच्या बातम्यांवरून स्टॉकमध्ये वाढ होत असल्याचे चॉईस ब्रोकिंगचे सुमीत बगाडिया म्हणाले, स्टॉकने नुकतीच 140 रुपयांची पातळी ओलांडली आहे आणि पुढील 15 दिवस ते महिनाभरात तो 180-200 रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. बगाडिया यांनी असेही सांगितले की मल्टीबॅगर केमिकल्सच्या या स्टॉकला 130-140 रुपयांच्या पातळीवर मजबूत सपोर्ट आहे. ज्यांच्या पोर्टफोलिओमध्ये हा स्टॉक आहे तो शॉर्ट टर्मसाठी 180-200 रुपयांच्या टारगेटसाठी ठेवण्याचा सल्ला दिला आहे.

share and stock market
2022 मध्ये 'हे' 3 स्टॉक्स मल्टीबॅगर पेनी स्टॉक बनू शकतात

इशान डाईज आणि केमिकल्सची शेअर किंमत

या स्टॉकने 2021 मध्ये मल्टीबॅगर परतावा दिला आहे. गेल्या एका वर्षात हा स्टॉक 53.30 रुपयांवरून 166 पर्यंत वाढला आहे आणि जवळपास 200 टक्के परतावा दिला आहे. गेल्या एका महिन्यात, तो 100 रुपयांवरून 166 रुपयांवर गेला आहे आणि 65 टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com