esakal | करदात्यांसाठी चांगली बातमी! इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची अंतिम तारीख वाढली
sakal

बोलून बातमी शोधा

income_20tax

कोरोना काळात आयकर विभागाने रिटर्न भरण्याची तारीख वाढवली आहे.

करदात्यांसाठी चांगली बातमी! इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची अंतिम तारीख वाढली

sakal_logo
By
सकाळन्यूजनेटवर्क

नवी दिल्ली- कोरोना काळात आयकर विभागाने रिटर्न भरण्याची तारीख वाढवली आहे. आयकर विभागाने दिलेल्या माहितीनुसार नागरिकांना 2019-20 वर्षासाठीचे आपले रिटर्न 31 डिसेंबर 2020 पर्यंत भरता येणार आहे. याआधी यासाठीची शेवटची तारीख 30 नोव्हेंबर 2020 करण्यात आली होती. 

केंद्रीय वित्त मंत्रालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार वेतन घेणारे आणि करदाते, ज्यांना रिटर्नमध्ये ऑडिट रिपोर्ट लागत नाही, ते 31 डिसेंबर 2020 पर्यंत रिटर्न दाखल करु शकतात. तचेस टॅक्सपेअर, ज्यांना ऑडिट रिपोर्ट भरावी लागते, त्यांना आपली आयटी रिटर्न दाखल करण्याची अंतिम तारीख 31 जानेवारी 2021 निश्चित करण्यात आली आहे. 

दिवाळी भेट ! मोदी सरकार भरणार मॉरॅटोरियम काळातील चक्रवाढ व्याज

याआधी सरकारने मे महिन्यात वित्त वर्ष 2019-20 साठी आयकर रिटर्न भरण्याची अंतिम तारीख वाढवून 30 नोव्हेंबर 2020 केली होती. याशिवाय काही कर संबंधी वादांना निकाली काढण्यासाठी 'वादातून विश्वास योजने'चा लाभ कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय 31 डिसेंबर 2020 करण्यात आला होता. सरकारच्या या निर्णयामुळे अनेकांना लाभ होणार असल्याचे सांगितले जाते. व्यापारी, प्रोफेशनल्स वेतनधारी आणि अन्य करदात्यांना याचा फायदा होईल. 

दरम्यान, कोरोना महामारीमुळे सर्वजण कठीण प्रसंगातून जात आहेत. अशावेळी आयकर रिटर्न भरण्यासाठी आवश्यक कागदपत्रे जमा करणे कठीण जाणार आहे. अनेकजण वर्क फ्रॉम होम करत आहेत. सरकारच्या निर्णयाचा त्यांनाही फायदा होणार आहे. अनेकजण रिर्टन दाखल करण्यास उशीर झाल्याने होणाऱ्या पॅनल्टी आणि डिफॉल्टमधून वाचणार आहेत. 

loading image