एचडीएफसीकडून कर्जदरात कपात; किती ते वाचा?

वृत्तसंस्था
Thursday, 23 April 2020

गृहकर्ज वितरण कंपनी हाउसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कॉपोर्रेशनने (एचडीएफसी) गृहकर्जांच्या किरकोळ प्रमाण व्याजदरात ०.१५ टक्‍क्‍याची कपात केली आहे. नवीन दर आता ८.०५ ते ८.८५ टक्‍क्‍यांदरम्यान असेल.

 नवी दिल्ली - गृहकर्ज वितरण कंपनी हाउसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कॉपोर्रेशनने (एचडीएफसी) गृहकर्जांच्या किरकोळ प्रमाण व्याजदरात ०.१५ टक्‍क्‍याची कपात केली आहे. नवीन दर आता ८.०५ ते ८.८५ टक्‍क्‍यांदरम्यान असेल. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

एचडीएफसीकडून नवा दर बुधवारपासून लागू करण्यात आला आहे. एचडीएफसीने केलेल्या कपातीमुळे गृहकर्ज घेणाऱ्या ग्राहकांना लाभ मिळणार आहे. नव्याने गृहकर्ज घेणाऱ्या ग्राहकांबरोबरच विद्यमान कर्जदारांनाही हे दर लागू असतील. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Debt reduction from HDFC