Stock Split : 1 वर्षात 'या' शेअरने दिला तब्बल 900% रिटर्न, आता होणार स्टॉक स्प्लिट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Deep Diamond India Stock Split

Stock Split : 1 वर्षात 'या' शेअरने दिला तब्बल 900% रिटर्न, आता होणार स्टॉक स्प्लिट

Deep Diamond India Stock Split : शेअर बाजारात पैसे गुंतवून बक्कळ नफा कमवायचा विचार तुम्ही करत असाल तर बी बातमी तुमच्यासाठी आहे. आम्ही तुम्हाला शेअर बाजारातील तज्ज्ञ जो सल्ला देतात त्यावर आधारीत शेअर्सची माहिती देत असतो.

अशात तुम्ही डीप डायमंड इंडियावर (Deep Diamond India) फोकस करु शकता. कंपनीने काही काळापूर्वी स्टॉक स्प्लिटची घोषणा केली आहे. (Deep Diamond India Stock Split Announcement : share market )

कंपनीने प्रत्येकी 10 रुपये फेस व्हॅल्यूचे प्रत्येकी 1 रुपयाच्या 10 इक्विटी शेअर्समध्ये विभाजित करण्यास मान्यता दिली आहे. रेकॉर्ड तारखेपर्यंत एक्स-स्प्लिट तारखेला स्टॉक ठेवलेल्या गुंतवणूकदारांना डीमॅट खात्यात नवीन शेअर्स मिळतील.

यामुळे तुमच्यासाठी उपलब्ध शेअर्सची संख्या वाढते. त्याच वेळी, शेअर्सची किंमत कमी होते. पण, स्टॉक स्प्लिटमुळे तुम्ही गुंतवलेल्या पैशावर परिणाम होत नाही.

हेही वाचा: Best Stock : 1 लाखाचे 74 लाख, 'हा' स्मॉलकॅप स्टॉक तुम्हालाही माहिती आहे?

डीप डायमंड इंडियाने गेल्या एक वर्षाच्या कालावधीत गुंतवणूकदारांना उत्कृष्ट परतावा दिला आहे. गेल्या एका वर्षात हा शेअर 901 टक्क्यांनी वाढला आहे. त्याच वेळी, गेल्या एका महिन्यात त्यात 34 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

गेल्या 6 महिन्यांत गुंतवणूकदारांना 300 टक्क्यांचा बंपर नफा मिळाला आहे. गेल्या 5 वर्षांचा विचार केल्यास हा शेअर 960 टक्क्यांनी वधारला आहे. स्टॉकचा 52 आठवड्यांचा उच्चांक 171.95 रुपये आहे तर 52 आठवड्यांचा नीचांक 11 रुपये आहे.

हेही वाचा: Best Stock : 1 लाखाचे 74 लाख, 'हा' स्मॉलकॅप स्टॉक तुम्हालाही माहिती आहे?

मार्च 2022 मध्ये, डीप डायमंड इंडियाच्या एका शेअरची किंमत 12.80 रुपये होती. तर सध्या हा शेअर 152.65 रुपयांवर आहे. याचा अर्थ गुंतवणुकदारांचा पैसा केवळ 10 महिन्यांत जवळपास 12 पटीने वाढला आहे.

जर तुम्ही मार्च 2022 मध्ये या स्टॉकमध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते तर आज तुमचे पैसे जवळपास 12 लाख रुपये झाले असते.

हेही वाचा: Best Stock : 14 वर्षांत गुंतवणूकदार कोट्यधीश… आता याच शेअरची डिलिस्ट होण्याची तयारी…

डीप डायमंड इंडियानेही नुकतेच आपले तिमाही निकाल जाहीर केले आहेत. कंपनीने 61 लाख रुपयांचा निव्वळ नफा नोंदवला, जो मागील वर्षीच्या तुलनेत जवळपास दुप्पट आहे. कंपनीच्या खर्चात झालेली घट हे त्याचे प्रमुख कारण आहे.

डीप डायमंड्स 18k रियल डायमंड ज्वेलरी आणि सॉलिटेअर्सची रेंज ऑफर करते आणि जवळपास 25 वर्षांपासून या व्यवसायात आहे.

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.