सूक्ष्म वित्त संस्थांचे कामकाज ठप्प 

वृत्तसंस्था
शनिवार, 19 नोव्हेंबर 2016

कोलकाता: पाचशे व हजारच्या नोटा बंद करण्यात आल्याचा फटका सूक्ष्म वित्त संस्थांना मोठ्या प्रमाणात बसला असून, त्यांचे कामकाज ठप्प झाले आहे. 

नोटाबंदीनंतर बंधन आणि व्हिलेज फायनान्शियल सर्व्हिसेससारख्या सूक्ष्म वित्त संस्था बचत गटांना 9 नोव्हेंबरपासून कर्ज वितरण करू शकलेल्या नाहीत. हीच परिस्थिती सर्वच सूक्ष्म वित्त संस्थांची आहे. बंधन बॅंकेचे व्यवस्थापकीय संचालक सी. एस. घोष म्हणाले,

"चलनातील छोट्या नोटा उपलब्ध नसल्यामुळे बचत गटांना निधी पुरवठा करणे बंद झालेले आहे. कर्ज पुरवठा बंद झाला असला तरी कर्ज परतफेड मात्र, सुरू आहे. ही समस्या तात्पुरत्या स्वरूपाची असून, पाचशे रुपयांच्या नव्या नोटा उपलब्ध झाल्यानंतर पुन्हा कामकाज सुरळीत होईल.'' 

व्हिलेज फायनान्शियल सर्व्हिसेसचे अध्यक्ष अजित मैती म्हणाले, "कर्जवितरण 9 नोव्हेंबरपासून बंद आहे. यामुळे तात्पुरत्या स्वरूपाचा फटका बचत गटांना बसत आहे. आणखी काही अशीच परिस्थिती राहणे अपेक्षित आहे.'' 
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Demonetisation halts disbursements by micro-finance firms