डीएचएफएल काढणार मार्ग, सादर केला अॅक्शन प्लॅन...

वृत्तसंस्था
बुधवार, 7 ऑगस्ट 2019

महिनाभराच्या चर्चेनंतर अखेर दिवाण हाऊसिंग फायनान्स कॉर्पोरेशनने (डीएचएफएल) कर्ज देणाऱ्या बॅंका आणि वित्तसंस्थांसमोर नवा प्लॅन ठेवला आहे.

मुंबई: महिनाभराच्या चर्चेनंतर अखेर दिवाण हाऊसिंग फायनान्स कॉर्पोरेशनने (डीएचएफएल) कर्ज देणाऱ्या बॅंका आणि वित्तसंस्थांसमोर नवा प्लॅन ठेवला आहे. शेअर बाजारालासुद्धा कंपनीने यासंदर्भातील माहिती दिली आहे. विशेष समितीसमोर डीएचएफएल कच्चा मसुदा ठेवणार आहे. त्याचबरोबर कर्जदारांनाही हा प्लॅन देण्यात आला आहे. या नव्या प्रस्तावानुसार देणेकऱ्यांच्या मुळ भांडवलाला धक्का लागणार नाही. मात्र बॅंकांच्यासंदर्भात आणखी कायदेशीर कालावधीची मागणी कंपनीने केली आहे.

 कंपनी बॅंकांकडून ताज्या वित्त पुरवठ्यासाठी प्रयत्नशील आहे. या निर्णयानंतर कंपनीच्या शेअरच्या किंमतीत 8.58 टक्क्यांची वाढ झाली होती. डीएचएफएलला बॅंकांनी 40,600 कोटी रुपयांचे कर्ज दिले आहे. तर बॉंड आणि डिबेंचर्सच्या माध्यमातून डीएचएफएलवर 45,380 कोटींची जबाबदारी आहे. डीएचएफएलच्या एकूण कर्जाची मालमत्ता 98,000 कोटी रुपये इतकी आहे. कर्जाच्या परतफेडीसाठी कंपनी 6 ते 12 महिन्यांच्या वाढीव कालावधीसाठी प्रयत्नशील आहे. युनियन बॅंकेच्या नेतृत्वाखालील बॅंकांच्या गटाने डीएचएफएलच्या प्रस्तावाला मंजूरू दिली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: DHFL says its lenders will not have to take a haircut