Map My India चा लवकरच येणार IPO, जाणून घ्या सर्व डिटेल्स

IPO
IPOIPO
Summary

कंपनी एमजी मोटर (MG Motor) आणि बीएमडब्ल्यू (BMW) कार्सची नेव्हिगेशन सिस्टमदेखील चालवते.

डिजिटल नकाशा निर्माता मॅप माय इंडिया (MapmyIndia) या आठवड्यात त्याच्या इनिशियल पब्लिक ऑफरसाठी (IPO) कागदपत्रे दाखल करण्याची शक्यता आहे. आयपीओच्या (IPO) माध्यमातून 1,000 कोटी ते 1,200 कोटी रुपये उभे करण्याची कंपनीची योजना आहे. कंपनी देशातील अॅपल मॅप्ससाठी सेवा देते. कंपनी एमजी मोटर (MG Motor) आणि बीएमडब्ल्यू (BMW) कार्सची नेव्हिगेशन सिस्टमदेखील चालवते.

IPO
वर्षभरात दुसऱ्यांदा पगारवाढ, जाणून घ्या कोणती आहे 'ही' कंपनी

मॅप माय इंडियाच्या आयपीओसाठी (IPO) 5,000-6,000कोटी रुपयांचे मुल्यांकन (Valuation) हवे आहे. मात्र,मॅप माय इंडियाचा (MapmyIndia)आयपीओ पूर्णपणे विक्रीसाठी (Offer for sale)देण्यात येणार आहे. यात कंपनीच्या सुरुवातीच्या गुंतवणूकदारांना त्यांचा हिस्सा विकण्याची संधी मिळेल. त्यांच्या गुंतवणूकदारांमध्ये क्वालकॉम,फोनपे आणि जपानची नकाशा निर्माता जेनरिन यांचा समावेश आहे.

IPO
भारताचा चुकीचा नकाशा; ट्विटर इंडियाच्या प्रमुखाविरोधात गुन्हा दाखल

या वर्षाच्या सुरुवातीला, सरकारने मॅपिंगवरील निर्बंध शिथिल केले आणि स्थानिक कंपन्यांना नकाशांसह भू-स्थानिक (geospatial) डेटा गोळा करण्याची आणि साठवण्याची परवानगी दिली. मॅप माय इंडिया (MapmyIndia) कंपनी ही त्या निवडक स्टार्टअप्स पैकी अशी एक कंपनी आहे, ज्या सध्या नफ्यामध्ये आहेत. याची सुरुवात राकेश वर्मा आणि रश्मी वर्मा यांनी केली होती. जे पती-पत्नी आहेत. आयपीओ येईपर्यंत हे दोघेही कंपनीचे प्रमोटर्स (Promotors)राहतील.

IPO
जगाचा नकाशा

मॅप माय इंडियाच्या (MapmyIndia)सुरुवातीच्या ग्राहकांमध्ये कोका कोलाचा समावेश आहे, कोका कोलाने आपले वितरण (Logistics And Distribution) मजबूत करण्यासाठी मॅप माय इंडियाच्या सेवांचा वापर केला. मॅप माय इंडियाने गेल्या वर्षी कंटेन्मेंट झोन्स यासोबतच (containment Zone), चाचणी केंद्र (Testing Centers) आणि उपलब्ध असलेल्या इतर महत्त्वाच्या माहितीसह कोव्हिड-19 डॅशबोर्ड देखील तयार केले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com