तुम्ही घेतलेल्या कर्जाचा दर कमी झालाय का?

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 6 जून 2019

रिझर्व्ह बँकेने जानेवारी 2019 पासून आतापर्यंत सलग तिसऱ्यांदा रेपो दरात कपात केली आहे. रिझर्व्ह बॅंकेच्या पतधोरण समितीने आज (गुरूवार) दुसऱ्या द्वैमासिक पतधोरणात पाव टक्क्याने व्याजदर कपात केली.

नवी दिल्ली: रिझर्व्ह बँकेने जानेवारी 2019 पासून आतापर्यंत सलग तिसऱ्यांदा रेपो दरात कपात केली आहे. रिझर्व्ह बॅंकेच्या पतधोरण समितीने आज (गुरूवार) दुसऱ्या द्वैमासिक पतधोरणात पाव टक्क्याने व्याजदर कपात केली. पाव टक्का कपात करून समितीने रेपो दर 5.75 टक्‍क्‍यांपर्यंत कमी केला. मात्र त्याला अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने वाहन आणि गृह कर्जाचे व्याजदर तुलनेने अजूनही जास्तच आहेत. त्यामुळे आता बँकांची जबाबदारी वाढली असून कर्ज स्वस्ताईची अपेक्षा ग्राहक आणि उद्योजकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

गेल्या तीन पतधोरणात रेपो दर 0.75 टक्क्यांनी कमी झाला असला तरी स्टेट बँक आणि इतर बड्या बँकांनी त्यांचा व्याजदर केवळ 0.15 ते 0.20 टक्क्यांनी कमी केला आहे. ठेवीदर आणि कर्जदर यांच्यात मार्जिन कमी असल्याने बँका व्याजदर कमी करण्यात चालढकल करण्यात येत आहे. मध्यवर्ती बँकेकडून चालू वर्षात रेपो दर 0.75 टक्क्यानी कमी केला असला तरी याचा प्रत्यक्ष फायदा ग्राहकांना मिळालेला नाही. बँकांना मात्र याचा फायदा नक्कीच झाला आहे.

तुम्ही घेतलेल्या कर्जाचा दर कमी झालाय का? रिझर्व्ह बँकेने सर्व बँकांना ग्राहकांपर्यंत रेपोदर कपातीचा फायदा पोचवण्याचे निर्देश दिले आहेत. मात्र बँकांकडून अजूनही प्रत्यक्ष ग्राहकांना फायदा पोचवला जात नाहीये. यावर तुमचं काय मत आहे हे आम्हाला webeditor@esakal.com वर जरूर कळवा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Do you have a reduced loan rate?